जालना – चार वर्षांपासून जालना हॉस्पिटल अंबड चौफुली जालना येथे दोन-तीन जिल्ह्यातून व जवळपास 11-12 तालुक्यातून येणाऱ्या सर्वसाधारण व गोरगरीब रुग्णांवर अविरत चांगल्यात रुग्णसेवा देत आलं आहे.हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांना अँजिओग्राफी व गरज असल्यास अँजिओप्लास्टी करायला इतरत्र जावे लागू नये या साठी शेकडो रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची मागणी होती म्हणूनच ही सुविधा हॉस्पिटल प्रशासनाने काल दिनांक 01 जून पासून प्रथम रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करून उपलब्ध करून दिली आहे.
जालना हॉस्पिटल ने सुरू केलेल्या या सुविधेचा गरजू रुग्णांनी व नातेवाईकांनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांनी केले आहे.जालना हॉस्पिटल सदैव रुग्णांच्या सेवेत तत्पर असतेच,कोविड काळात सुद्धा कमीत-कमी खर्चात उपचार देणारे हॉस्पिटल असे रुग्णांच्या प्रतिक्रियांवरून आहे .कोविड काळात आतापर्यंत जवळपास 1200 पेशंटवर इलाज करून फक्त पाच -सहा रुग्ण वगळता सर्वच रुग्ण कोरोनावर मात करून घरी सुखरूप गेले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेले परिसरातील व बाहेर तालुके व जिल्ह्यातील डॉक्टर्स,वर्ग एक चे अधिकारी,वर्ग दोन चे अधिकारी,वर्ग तीनचे कर्मचारी,व सर्व सामान्य लोकांचे विश्वसाचे हॉस्पिटल म्हणून स्वतंत्र ओळख जालना हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी निर्माण केले आहे.रुग्णांचा विश्वास कायम टिकून रहावा म्हणून हॉस्पिटलमधील सर्वच डॉक्टर्स इतर स्टाफ कार्य करतांना दिसत असतात.म्हणून रुग्णाच्या विश्वासाचं हॉस्पिटल म्हणून अंबड चौफुली येथील जालना हॉस्पिटलकडे रुग्णांची गर्दी नेहमीच पाहावयास मिळते .