गजानन सोनटक्के जळगाव जा – पवित्र तीर्थक्षेत्र आळंदीपासून अगदी जवळच असलेल्या भोसरी दिघी परिसरात बारी समाज विकास ट्रस्ट पिंपरी चिंचवड अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे, बारी समा ज विकास ट्रस्टच्या सात हजार चौरस फूट जागेत बारी समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ रूपलाल महाराज समाज मंदिर आणि बारी भवन उभे राहत आहे, समाजाच्या अनमोल सहकार्यातून या ठिकाणी सुंदर वास्तू उभी राहत आहे, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने बारी समाज विकास ट्रस्ट आजपर्यंत अनेक उपक्रम राबवत आले आहे यामध्ये विद्यार्थी गुणगौरव, स्नेहमेळावा, संकट काळात बारी समाजातील काही कुटुंबांना आर्थिक मदत असे अनेक उपक्रम सतत चालू असतात आणि याचाच एक भाग म्हणून बारी समाज विकास ट्रस्टच्या सात हजार चौरस फूट परिसरात दिनांक 4 जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री विकास भाऊ डोळस, कुलदीप भाऊ परांडे, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री ओंकार काटोले, हरिभाऊ तांदळे (विदर्भ मित्र मंडळ अध्यक्ष), सुखदेव वानखेडे (विदर्भ माळी संघ अध्यक्ष)तसेच ट्रस्टचे उपाध्यक्ष राजेश काळपांडे, कार्यकर्ते विजय कोथळकर ,अनंत दामधर, रमेश भोंडे, संदीप हिस्सल, सुरेश अस्वार, मनोहर पवार डॉ. अतुल कोल्हे, राम काळपांडे, सुरेश मिसाळ,विठ्ठल कपले,दिनेश रौंदाळे, संजय बारी,शेषराव नानकदे,प्रशांत बारी,भरत बारी, आशिष ढगे,अशोक धुळे, समाधान दलाल, कविता ढगे,मनीषा धुळे विवेक काटोले आणि मोठ्या संख्येने बारी समाजाचे कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ओंकार काटोले म्हटले की वृक्षारोपण ही काळाची गरज असून ऑक्सिजन निर्मितीचा एक मोठा स्रोत आहे, प्रमुख पाहुणे विकासभाऊ डोळस आणि कुलदीप भाऊ परांडे यांनी ट्रस्टच्या कामाचे कौतुक करून ट्रस्टला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Related Posts