कॉम्पुटर संस्था सुरु करण्याची परवानगी द्या अन्यथा संस्थाचालक आत्महत्येचा पर्याय निवडतील- राज्यपालांकडे साद
नागपुर – २०२० चे मार्च पासून सुरु झालेली टाळेबंदी व तेव्हापासून बंद असलेल्या शिक्षण संस्था व कोचिंग क्लास यासोबत राज्यातील कॉम्पुटर प्रशिक्षण केंद्रसुद्धा त्याच प्रवर्गात असल्यामुळे ह्या कॉम्पुटर प्रशिक्षण संस्था बंदच आहे . कॉम्पुटर प्रशिक्षण घेतांना विद्यार्थी संख्या हि मर्यादित असते व अधिकतर संस्था ह्या किरायाच्या जागेत आहे , अनेक संस्थाचालकांनी बँकांचे लोण घेतलेले आहे ते हप्ते थकीत आहे ह्या कॉम्पुटर प्रशिक्षण संस्थांना कोचिंग क्लास या वर्गीकरणातून बाहेर काढून नियम व अटींच्या अधीन सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी अन्यथा संस्थाचालक आत्महत्येचा पर्याय निवडतील अशी परिस्थिती आहे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कॉम्पुटर संस्थाचालक संघटनेच्या वतीने उपाध्यक्ष जगदीश वैद्य यांनी केले महामहिम राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले व संस्थाचालकांचे प्रश्न समजावून घेतले .
ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण व ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी अनेक ओबीसी समाजाच्या संघटना व नेत्यांनी खासदार रामदास तडस यांनी भेट घेऊन मागणी करण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने आज नागपूर येथे महामहीम राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांची खासदार रामदास तडस व शिष्टमंडळासह भेट घेऊन ओबीसी समाजाला न्याय देण्याकरिता सहकार्य करण्याची मागणी केली. यावेळी डॅा. भुषन कर्डीले, गजुनाना शेलार, बळवंत मोटघरे, जगदीश वैद्य, अतुल वांदिले, संकेत बावनकुळे, कुणाल पडोळे, प्रशांत इखार, विपीन पिसे उपस्थित होते.