जागृती महिला अर्बनचे कार्य प्रेरणादायी
◆मा.आ.श्री राहुलभाऊ बोन्द्रे
जागृती महिला अर्बनची नेत्रदीपक कामगिरी
◆मा.आ.सौ.रेखाताई खेडेकर
संस्थेची व्यापकता हि ग्राहकांच्या विश्वासामुळे ..
◆मा.श्री श्यामभाऊ उमाळकर
राजकारण आणि सहकारापलीकडे बांधिलकी जमपणारे नेतृत्व दिपकभाऊ देशमाने…….
◆मा.श्री ऋषीभाऊ प्रतापराव जाधव जागृती महिला लघु व्यवसाय अर्थसहाय्य विभागाचे उदघाटन श्री. मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा जागृती महिला अर्बनचे मार्गदर्शक मा.श्री दीपकभाऊ देशमाने यांच्या जन्मदिवसाचे औचित्त साधून मा. आ. राहुल भाऊ बोंद्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी 22 बचत गटांना 2 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.
माजी आमदार रेखाताई खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली, प्रदेश काँग्रेस कमिटीने सरचीटणीस शामभाऊ ऊमाळकर आणि युवासेना अध्यक्ष ऋषिकेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात
उत्कृष्ट महिला बचत गटांना भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
महिलांना विविध उपक्रमांद्वारे आर्थिक सक्षम करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ जयश्रीताई देशमाने आणि संस्थेचे मार्गदर्शक दीपकभाऊ देशमाने ह्यांनी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. जयश्रीताई देशमाने या महिला सक्षमीकरणासाठी सदैव प्रयत्नशील असतात. संस्थेचा वाढता विस्तार आधुनिक सेवा सुविधा याद्वारे समाज जीवनामध्ये अर्थक्रांतीला नवसंजीवनी प्राप्त झाली. परिसरातील ५००० पेक्षा जास्त महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा जयश्री देशमाने यांनी दिपकभाऊंच्या वाढदिवसाचे औचित्त साधून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सदर उपक्रम राबविला. दीपक भाऊंच्या मार्गदर्शनाने जागृती महिला अर्बनने कमी कालावधीत उत्कर्ष साधला आहे. आणि ही दैदिप्यमान प्रगती दीपक भाऊंच्या कार्यातील सातत्यामुळे मिळाल्याचे प्रतिपादन रेखाताई खेडेकर यांनी केले, दीपक भाऊंची प्रचंड मेहनत आणि नियोजन म्हणजे जिल्हाभरातील मुंगसाजी महाराज पतसंस्थेचा वाढता विस्तार अर्थक्रांतीतील नवी भरारी देण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे राहुल भाऊ बोंद्रे यांनी व्यक्त केले. दीपक भाऊंची सहकार क्षेत्रातील अल्पावधीतील घोडदौड ही खूप प्रेरणादायी आहे तसेच सहकार क्षेत्रातील नवोदितांना मार्गदर्शकरुपी असल्याचे मनोगत श्यामभाऊ उमाळकर यांनी व्यक्त केले. भविष्यामध्ये महिलांना लघु उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी दीपक भाऊंना आपल्या भाषणातून केले. जागृती महिला अर्बन द्वारे महिलांच्या विकासाच्या विविध योजना संगणकीकृत कार्यप्रणाली मार्गदर्शक शिबिरे याद्वारे महिलांच्या उन्नतीसाठी जागृती महिला अर्बन सदैव आपल्या पाठीशी आहे असे सूचक उपस्थित प्रचंड महिला वर्गांना सौ जयश्रीताई देशमाने यांनी आपल्या भाषणातून महिलांशी संवाद साधताना व्यक्त केले. भाऊंच्या वाढदिवसा निमित्त समाजातील विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी कठीण परिश्रम घेतले.