
प्रतिनिधी चिखली भिकनराव भुतेकर – कोरोना विरुद्धच्या लढाईत आपलाही काही सहभाग असावा या विचाराने प्रेरित होऊन अंचरवाडी येथे सर्वपक्षीय युवकांनी पुढाकार घेत व हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीचे औचित्य साधत ता.१८ जून रोज शुक्रवार ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.श्री.ज्ञानेश्वर परिहार(मा.सरपंच)यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. जनकल्याण रक्तपेढी जालना सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी सरपंचपती समाधान पाटील परिहार, उपसरपंच सुनील पा.परिहार, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण श्रीराम परिहार शिबिराचे आयोजक :- सचिन मो.परिहार,पृथ्वीराज चौहान,अनंता काशीकर,विलास ज्ञा.परिहार व त्यांना मोलाचे सहकार्य करणारे ३५ रक्तदाते यांच्यासह आदीं लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम आनंदी वातावरणात पार पडला.