आता भाजपने काँग्रेसला तात्काळ सरकारमध्ये सहभागी करून घ्यावे म्हणजे पक्षश्रेष्ठींना निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्यास वेळ मिळेल – भाजपा ज्येष्ठ नेते अरुण चांडक
शेगाव – भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या विविध पक्षातील इनकमिंग ला आता त्याच पक्षातील कार्यकर्ते कंटाळले असून बऱ्याच दिवसापासून या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे . परंतु कोणीही उघडपणे व्यक्त होत नव्हते मात्र आज भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अरुण चांडक यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट भाजपा श्रेष्ठींच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

माजी नगरसेवक अरुण चांडक यांनी आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की आता एकदा भाजपने काँग्रेसला सरकारमध्ये सामील करून घेऊन काय तो एकदाचा निवाळा करावा म्हणजे माननीय फडणवीस साहेबांना निष्ठावंत नेते व कार्यकर्त्यांकडे लक्ष देता येईल या पोस्टला नेटकऱ्यांकडून असंख्य लाईक्स मिळत असून नेटकरी ही पोस्ट व्हाट्सअप ग्रुप वर फॉरवर्ड करताना दिसत आहे.