अखेर बैलगाडा शर्यत सुरु…! सिंदखेडराजा तालुक्यातुन कोर्टाच्या निर्णयाचे बैलगाडा शर्यतप्रेमी कडून स्वागत
सिंदखेडराजा -(प्रतिनिधी सचिन मांटे)आज कोर्टाने दिलेल्या निर्णयांचे बैलगाडा शर्यतप्रेमी कडून स्वागत करण्यात आले,शेतकऱ्यांचा जिवाभावाचा सोबती म्हणून बैल या प्राण्याची ओळख यात बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्र राज्यातील एक शर्यत प्रेमीसाठी एक महत्वाचा विषय आहे.गेली काही वर्षापासून बैलगाडा शर्यत या वर बंदी घातली.पण कोर्टाने आज काही निर्बंध शिथिल करून बैलगाडा शर्यतस मान्यता दिली.
त्याचा जल्लोष काल तालूक्यातील शर्यत प्रेमीनी साजरा केला किनगावराजा येथील शर्यत प्रेमी व बैल गाडा मालक यांनी आपला आनंद व्यक्त करतांना आमच्यासाठी बैलगाडा शर्यतिचा खेळ नसून बैलप्रति आमचा जिव्हाळाच्या विषय आहे अशी प्रतिक्रिया देवानंद केकाण यांनी दिली त्यांच्या सोबतच शिवानंद मुंढे, गणेश काकड, गिराम,यांनी फटाके फोडून गुलालची उधळण करून आपला जलोष साजरा केला.बैलगाडा शर्यतसाठी जिल्हाअधिकारी कार्यालयची परवानगी घेने आवश्यक असून राज्य सरकारसाठी नियमावली कोर्टाने कालच्या निर्णयात दिली आहे.
बैलगाडा शर्यतीस कोर्टाने मान्यता दिल्याबद्दल राज्याचे अन्न व औषधं प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी सुद्धा राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे व मा. सर्वोच्च न्यायालयाचे मनस्वी आभार ! अशी प्रतिक्रिया दिली.