बीड – दिल्लीमध्ये केंद्र सरकारचा झालेले मंत्रिमंडळ विस्तार व त्यात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपदापासून डावलल्यानंतर बीडमधील कट्टर मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कालपासून राजीनामासत्र सुरू केलं आहे. जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर, आज एकाच दिवशी 11 भाजपच्या तालुकाध्यक्षांसह 36 जणांनी राजीनामे दिले आहेत.दरम्यान एकाच दिवशी राजीनामे दिल्याने, भाजपला बीडमधून हा भाजप साठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. राज्यभरातून देखील भाजपमधील मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणावर राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र बीडमधील या राजीनाम्यांनी भाजपची बीड जिल्हा बॉडी बरखास्त होण्याच्या मार्गावर असून यावर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार ? याकडं राजकीय वर्तुळातून लक्ष लागलं आहे.
बीड जिल्यानंतर बुलढाणा जिल्यातील सिंदखेड राजा मतदार संघात स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांच्यानंतर पंकजा मुंढे यांना मानणारा व समर्थन करणारा मोठा वर्ग आहे . गोपीनाथ मुंढे यांच्या निधनांनंतर सिंदखेड राजा येथूनच पंकजा मुंढे यांनी पुन्हा संघर्ष यात्रा सुरु केली होती व या संघर्ष यात्रेस अभूतपूर्व गर्दी तेव्हा बघावयास मिळाली . बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केलं तसेच सिंदखेड राजा मतदार संघात गजानन मुंढे,शिवाजी काकड यांच्या भाजप सदस्यत्वाच्या राजीनाम्या शिवाय स्वतःला पंकजाताई समर्थक म्हणविणाऱ्या अनेक मोठ्यांनी मात्र अजून आपली राजकीय भूमिका घेतली नाही. नेते मंडळी दोन्ही थड्यावर हात ठेवण्याच्या भूमिकेत दिसून येत आहे.अश्या बेगडी नेत्या बद्दल सोशल मीडियात सर्व सामान्य मुंढे समर्थक फार मोठया प्रमाणात रोष व्यक्त करताना दिसत आहे.नेत्यांची ही चतुराई जण माणसाच्या ध्यानी आली आहे त्यामुळे आता येणाऱ्या दिवसात सिंदखेड राजा मतदार संघात व बुलढाणा जिल्यात पंकजा मुंढे समर्थक काय भूमिका घेतात हे उत्सुकतेचं व चर्चेचे ठरेल ….