गजानन सोनटक्के जळगाव जामोद – बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक डिजिटल साक्षरता अभियान गावागावात राबविल्या जात आहे दिनांक दोन जुलै रोजी सुनगाव येथे व आज तीन जुलै रोजी उसरा येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना संपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गजानन भाऊ सोनटक्के होते यावेळी जिल्हा केंद्रीय बँकेचे विभागीय अधिकारी देशमुख साहेब यांनी बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांबद्दल खातेदारांना माहिती दिली.
बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेचे जळगाव शाखेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक श्री नरेंद्र दाभाडे साहेब यांनी बँकेच्या बद्दल माहिती दिली व बँकेचे प्ले स्टोर वरील प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये घेण्यात येणाऱ्या ऍप बद्दल माहिती दिली व बँकेच्या कोणत्या कोणत्या सेवा पुरविल्या जातात त्याची माहिती दिली त्यानंतर श्री दत्ता भाऊ पाटिल यांनी आपल्या अनुभवातुन बँकेच्या व कर्मचाऱ्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली यावेळी बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेचे साहेब वसुली अधिकारी हॅलोडे साहेब व गटसचिव विजय भडकर्मचारी कैलास म्हस्के शिवाजी पाटील कैलास सरोदे सोळंके तायडे सुधीर घोंगे सिसोदे मूळे कर्मचारी हजर होते यावेळी उसरा येथील प्रतिष्ठित नागरिक राजकुमार पाटील अजाबराव शिंदे पोलीस पाटील सय्यद अयाज उद्दीन पोलीस पाटील उमेश पाटील ग्रामपंचायत सदस्य देवानंद भाऊ वानखडे हर्षद पाटील सिद्धार्थ जुमडे निकम सिंग राठोड विठ्ठल देशमुख इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी खरात साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण साहेब पालक अधिकारी ठाकरे साहेब गाडे साहेब चिंचोले साहेब इथापे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले होते