गजानन सोनटक्के जळगाव जा . संग्रामपूर तालुक्या मधील कुंदेगाव येथील 26 वर्षीय जन्मदात्यानेच दीड वर्षाच्या मुलासह स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . सदरील घटना दिनांक 28 मे च्या सकाळी उघडकीस आली या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे. सदर मृतक दीड वर्षीय मुलाचे नाव रोशन दिनेश वानखडे असे आहे व पित्याचे नाव दिनेश पुंडलिक वानखडे .
पती-पत्नीच्या कौटुंबिक वादामुळे हा अनर्थ घडला त्यामध्ये दीड वर्षिय रोशनला आपल्या जीवास मुकावे लागले . या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. 27 मे रोजी दिनेश हा त्याची सासरवाडी काकनवाडा येथे गेला होता. तेथे पती-पत्नीमध्ये वाद झाला दिनेश हा आपल्या दीड वर्षीय मुलासह 28 मे च्या पहाटेच साडेचार च्या सुमारास सासरवाडी वरून कुंदेफळ येथे गेला. त्यावेळी मृतक दिनेशच्या पत्नीने सासरे पुंडलिक वानखडे यांना फोनकरून विचारणा केली असता तुमचा मुलगा व नातू घरी पोहोचले काय ? ते पहाटेच साडेचार च्या सुमारास मुलासह घरुन निघुन गेले आहे. त्यावेळी दिनेशच्या नातलगांनी घरी व परिसरामध्ये दिनेश चा शोध घेतला असता दिनेश मिळून आला नाही .
दिनांक 28 मे रोजी सकाळी त्यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला दिनेश ने त्याच्या मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या दिसले . पती-पत्नीचा वाद होऊन रागाच्या भरात दिनेश सासर वरून निघून दीड वर्षाचे चिमुकल्या सह दिनेशने आत्महत्या केली. पती व पत्नीच्या वादातून दिनेशने आत्महत्या केल्याची चर्चा गावात होत आहे. घटनेची माहिती मिळताच संग्रामपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून दिनेश व दिनेश च्या मुलाचे प्रेत शवविच्छेदन करिता पाठवण्यात आले शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचेही शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले पुढील तपास संग्रामपूर पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार श्रीकांत विखे यांच्या मार्गदर्शनात तपास बीट जमदार नंदकिशोर तिवारी हे करीत आहे या घटनेमुळे संपुर्ण समाजमन व परिसर सुन्न झाले आहे.