बुलडाणा : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या दि. 30 एप्रिल 2008 रोजीच्या निर्देशाप्रमाणे 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिवस म्हणून सर्व जगात पाळण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधुन सहाय्यक कामगार आयुक्त, अकोला व सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा, यांचे संयुक्त विद्यमाने बालकामगार प्रथा विरोधी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सदर कार्यक्रमाअंतर्गत विविध आस्थापनांमध्ये बालकामगार ठेवण्यात येऊ नये यासाठी आस्थापना मालकांकडुन बाल कामगार कामावर ठेवणार नाही असे हमी पत्र लिहुन घेण्यात येणार आहे. तसेच पोस्टर कॉम्पीटीशन, कलाकारांच्या नजरेतुन बालकामगार अशा विविध कार्याक्रमांसह प्रशासकिय अधिकारी आणि NGO यांच्या समवेत कोविड-१९ चा प्रादुर्भाव बघता ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हयातील दुकाने, हॉटेल्स, व्यापारी संस्था, कारखाने व औद्योगीक आस्थापना मालकांनी, बाल कामगार कामावर ठेऊ नये, असे आवाहन राजु दे. गुल्हाने, सहाय्यक कामगार आयुक्त, अकोला व आ. शी. राठोड , सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा यांच्या मार्फत करण्यात येत आहे.