
गजानन सोनटक्के जळगाव जामोद – विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची महत्वाची आनलाईन प्रांत बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीला प्रांत संघटन मंत्री अरुणजी नरके प्रांत मंत्री गोविंद शेंडे. बजरंग दल प्रांत संयोजक अँड.अमोल अंधारे यांनी विभाग व जिल्हा स्थरावरील प्रमुख दायीत्वाच्या घोषणा जाहीर केल्या . त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातिल जामोद येथील कृष्णाई गोशाळा ट्रस्टचे अध्यक्ष श्री नंदुभाऊ दलाल यांची बजरंग दलाच्या जिल्हा संयोजक (अध्यक्ष) पदी नियुक्ती करण्यात आली तसेच विहपचे विभाग मंत्री पदी उद्धवराव सातव यांची नियुक्ती करण्यात आली याच्या नियुक्तीने तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.व सर्व स्तरातुन शुभेछांचा वर्षाव होत आहे.