औरंगाबाद येथील पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करा.अन्यथा जिल्हाभरात तीव्र आंदोलन करू! :- छगन झोरे
बुलढाणा:दि12:- फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्र मध्ये कायद्याच्या रक्षण करणारे व सदरक्षणाय व खलनिग्रनाय ब्रीद असणाऱ्या व पोलीस खात्यात काम करण्याऱ्या पोलिसांनाच जर मारहाण होत असेल तर.सर्व सामान्य माणसाच्या मनात अश्या गुंडांची भीती निर्माण होईल.अशी जनमानसात चर्चा रंगात आहेत. कायद्याचा वाचक गुंड प्रवृत्ती असलेल्यांवर असणे गरजेचे आहे. ह्या घटनेमुळे पोलिसांची प्रतिमा मालिन होत आहे.पोलिसांचे आत्मबल वाढण्या साठी ह्या गुन्हेगारावर कडक कार्यवाही करून कठोर शिक्षा देण्यात यावी , अन्यथा संपूर्ण जिह्याभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष छगन झोरे यांनी दिला आहे.
सिंदखेडराजा तहसीलदार यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री, गृहमंत्री, यांना सिंदखेडराजा तहसिल कार्यालया समोर जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वा खाली एक दिवसीय धरणे आंदोलन करून तहसीलदार सावंत यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी शिवाजीराजे जाधव, राजेंद्र आढाव, बुधु चौधरी, शेख यासिन,कैलास मान्टे, सुनील मान्टे,रवी ढवळे, राहुल झोटे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.