असोला बु. – निवडणुकीच्या दरम्यान मतदारांना अनेक आश्वासन द्याची आणि निवडणूक संपल्यानंतर त्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करायचे.ही आजच्या राजकारणाची पध्दत झाली आहे.परंतु मा.ना.डॉ राजेंद्र शिंगणे साहेब ह्या गोष्टीला अपवाद आहेत. असोला बु. हे गाव सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघामध्ये नव्याने समाविष्ट झालेले गाव यामध्ये मुलभूत सुविधांचा प्रचंड अभाव १८ विश्व पाण्यांचे दुर्भिक्ष्य अतिशय तीव्र अशी पाणी टंचाई मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाचा प्रश्न अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचा प्रश्न , शादी खाण्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न गावकरी निवडणूकी दरम्यान सांगत होते. आणि आम्ही ऐकून घेत होतो.आदरणीय साहेब आश्वासन देत होते लोक शब्दाला जागली आणि मताधिक्य साहेबांना मिळाले.
![](https://www.matrutirthalive.com/wp-content/uploads/2021/08/WhatsApp-Image-2021-08-08-at-21.31.04-576x1024.jpeg)
साहेब आमदार झाले,मंत्री झाले एक एक काम हातामध्ये घेत साहेबांनी एक कोटी अकारा लक्ष रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजुर केली.कब्रस्तान सरक्षण भिंत,महादेव मंदिर पोहोचरस्ता अशी एक कोटी पंचेचाळीस लक्ष रुपयांची कामे मंजुर केली.आज त्या कामांची उदघाटन करत असतांना जणु हा उदघाटन सोहळा नसुन वचनपूर्तीचा सोहळा असल्याची जाणीव गावकऱ्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होती.
ही वचनपूर्ती पूर्ण होतांना पाहून गावकरी आनंदी झाले आणि गावकऱ्यांनी मा.ना.डॉ राजेंद्र शिंगणे साहेबांचे जाहीर आभार मानले.