रोटी का कोई धर्म नही होता,
पानी की कोई जात नही होती..!
जहा इन्सानियत जिंदा है वहा,
मजहब की कोई बात नही होती..!!
सत्येंद्र भुसारी (भोरसाभोरसी) चिखली
8830161951

आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्यामुळे बकऱ्याची कुर्बानी त्या दिवसी न करण्याचा निर्णय मुस्लिम समाजबांधवांनी घेतला. मुस्लिम समाजाचा हा स्तुत्य निर्णय अभिनंदनीय आहे आणि धाडसाचाही आहे ! हिंदु धर्मियांच्या आस्था जपतांना बंधूभाव वाढावा हि त्यामागची भावना खरंच अभिनंदन करण्यासारखी आहे . सध्याच्या धार्मिक जातीय भेदभाव वाढीस लागत असल्याच्या बातम्यात हि असी बातमी आश्चर्यजनक वाटते व ती माणुसकी दाखवणारी वाटते ,माणुसकी वाढायला पोषकही ठरते. सगळेच समाज, धर्म परंपरागत सण साजरे करतांना त्या सणाच्यासोबत असलेल्या प्रथाही तितक्याच काटेकोरपणे पाळतात. त्यातल्या त्यात मुस्लिम व आदिवासी मंडळी परंपरा आणि प्रथा कटाक्षाने पाळतांना आढळतात. अशावेळी वर्षानुवर्षे चालत आलेली बकरीईदच्या दिवसीची कुर्बानीची प्रथा टाळण्याचा निर्णय म्हणूनच धाडसाचा ठरतो. कारण धार्मिक बाबतीत सुधारणा किंवा बदल करणे सोपे नसते. वयस्कर परंपरावादी आणि कट्टरतेकडे झुकलेल्यांना असे बदल पचनी पडायला अवघड जातात , त्यांना अशा सुधारण म्हणजे धर्मात ढवळाढवळ वाटते व ते धर्माला धोकादयक ठरेल असी एकप्रकारची भितीही काहींच्या मनात असते म्हणून काही प्रसंगी ते विरोधाची आक्रमक भुमिका घेण्यासही मागेपुढे पाहत नाहीत , त्यामुळे कोणी त्या वाटेला शक्यतो जात नाही. आणि जे जातात त्यांना त्यात यश मिळण्यापेक्षा तिरस्कारच वाट्याला येतो , काही काळाने ते समाजाला पटतेही पण तोपर्यंत सारंच अवघड असतं. अर्थात अशा सुधारणांचे दुरगामी परीणाम कायमस्वरूपी दिसून येतात. म्हणून हा निर्णय धाडसाचाही आहे !
गावागावात वर्षानुवर्षे सर्व समाजाचे सण ,ऊत्सव, महापुरूषांच्या जयंती, यात्रा- जत्रा, नवस अशा कार्यक्रमात सगळे जण सहभागी होवून आनंद देण्याघेण्याचे काम करीत असतात. लग्न कार्य, सुखदु:खाच्या वेळी सुध्दा सामाजिक धार्मिक बंधनं झुगारून माणसं मानवता धर्माने एकत्र येतात . हे सामाजिक बंधूभावाचे अर्थात भाईचाऱ्याचे चित्र महाराष्ट्राभर थोड्याफार फरकाने दिसते. तोच सामाजिक सद्भाव वरील निर्णयातून प्रकट होतो असे म्हणणे वावगे होणार नाही….
कुठे कोणाचं स्टेट्स ठेवलं म्हणून पेटणाऱ्या दंगली, तर कुठे महापुरूषाचा अवमान केला म्हणून निघणारे निषेध मोर्चे , तर कुठे ह्याहीपलिकडे जावून होणारी जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना अशा समाजविघातक व समाजात द्वेष भडकावू पाहणाऱ्या व सामाजिक वातावरण दुषित होतं की काय या भितीयुक्त परीस्थितीत हा एकोपा दाखविणारा व बंधुभाव वाढविणारा निर्णय अभिनंदनीय आहे. काही बोटावर मोजता येणारी लोकं सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतही असतील व कोणताही समाज चुकीच्या कामाला समर्थन देणार नाही.
समाजमनाला शांतता आणि सुव्यवस्था कायमस्वरूपी हवी असते गैरसमजातून होणारा गोंधळ समाजमनाला आवडत नाही. दैनंदिन व्यवसाय व जिवनक्रमात तशा दंगलींमुळे येणारे व्यत्यय सामान्यपणे कोणालाही नको असतात. शिवाय त्यामुळे वेगवेगळ्या समाजातील शेजारीपाजारी , मैत्री , व्यावसायिक संबंध यामध्ये येणारी बाधाही नको असते. भाईचारा/ बंधूभाव टिकावा हेच बहुतेकांना अपेक्षित असते. म्हणून “नफरतकी बाजार मे प्यारवाली दुकान” वेगळा ठसा ऊमटवून जाते ! संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मनाला सुखद धक्का देवून जाते !
ना तेरा धर्म बडा है,
ना मेरा धर्म छोटा है..!
नातू राजा है,
ना मैं है गुलाम हू..!
तू भी इन्सान है ,
मै भी इन्सान हू..!!
ईसरूळ , ईसोली, सवणा , चिखली, धाड , शेगांव, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा ,बीड अशा काही गावातील आषाढी एकादशीच्या दिवशी नो कुर्बानीच्या बातम्या वर्तमानपत्रात व सोशल मिडियावर झळकत आहेत असेच निर्णय महाराष्ट्रभर घेतले जावेत हिच अपेक्षा. 🙏आणि ह्यात कोणीही किंतुपरंतु काढून फाटे फोडू नयेत हि सुध्दा अपेक्षा .....