बुलडाणा दि.24 : अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत असलेला परवाना हा अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी विकसित केलेल्या FOSCOS या नवीन प्रणालीमध्ये योग्य अन्न पदार्थांच्या संवर्गात बदलून घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व उत्पादकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या परवान्याचे 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत योग्य त्या अन्न पदार्थाच्या संवर्गात सुधारणा करून घ्याव्यात. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तथापि त्यानंतर 31 ऑक्टोंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत शुल्क भरून परवान्यात सुधारणा करू शकणार. याबाबत उत्पादकांनी नोंद घ्यावी. मात्र कोणत्याही परिस्थितीत 1 जानेवारी 2022 नंतर अन्न पदार्थांच्या संवर्गासाठी सुधारणा केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. तरी सर्व उत्पादक अन्न व्यावसायिकांनी आपल्या परवान्यात योग्य त्या अन्न पदार्थांच्या संवर्गात सुधारणा न केल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत योग्य ती कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे सहायक आयुक्त (अन्न) स. द केदारे यांनी कळविले आहे.
Related Posts