Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जळगाव वनविभाग अंतर्गत अस्वलची अवयव तस्करीसाठी शिकार ?

ज. जा./ दि 26 /ता प्र (गजानन सोनटक्के जळगाव जा) जळगाव जा तालुक्यातील सूनगाव शिवार (जामोद बिट) च्या जंगलात मृत अस्वल कुजलेल्या अवस्थेत आढळून आले त्याचे नखे व दात चोरट्याने लांबवल्याची घटना उघडकीस आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली वणप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

VANVIBHAG

13 काळवीट हरणांची शिकार ची घटना ताजी असताना ,ही कुजलेले अस्वल मृत व अवयव त्याचे नखे व दात गायबस्थितीत आढळल्याने तालुक्यातील वनविभाग च्या अस्तित्व व कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित झाला आहे.सागवान तस्करी,गौण खनिज चोरी , कडुनिंब कटाई,डिंक तस्करी,अंजन पाला तस्करी, राखीव वनात अवैध चराई, असे सर्वच वनगुन्हे खुलेआम सूरु असताना बघ्याची भूमिका घेणारा वनविभाग आता ह्या एकापाठोपाठ एक होत असलेल्या वन्य प्राण्यांच्या होणाऱ्या मृत्यू ढिम्म बसून पाहत आहे.
दि 24 मे 2021 रोजी वनविभागाच्या पूर्व भिंगारा बिट मध्ये कँपर्टमेंट नंबर 631 च्या एका खोऱ्यातील ओढ्यात अंदाजे 8 ते 10 दिवस आधी मृत पावलेले एक मादी अस्वल अंदाजे 7 वर्ष वय असलेले मृत व कुजलेल्या अवस्थेत दिसून आले.
दहन प्रसंगी प्रत्यक्ष दर्शींच्या सांगण्यानुसार ह्या अस्वलची समोरच्या पायाची काही बोटे व नखे ही गायब होती ,त्याचप्रमाणे काही दात सुद्धा तोडून नेल्याचे दिसत होते, नियमानुसार पंचनामा व इतर सर्व सोपस्कार पूर्ण करून पंचांच्या उपस्थित दि. 24 ला संध्याकाळी अंदाजे 5 वाजता सदर अस्वलाला दहन देण्यात आले.
यावेळी याच शिवारात सलाईबन प्रकल्प येथे रहिवासी असणारे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक मंजितसिंग सिख ,वनपरिक्षेत्र अधिकारी बी.डी. कटारिया,पशुधन विकास अधिकारी,व वन कर्मचारी सह साक्षीदार व प्रत्यक्ष दर्शी म्हणून काही आदिवासी स्थानिक नागरिक उपस्थित होते.
अस्वल खालील एका कारणाने मृत झाले असेल असे दिसते.


१)तापत्या उन्हात तहानेने व्याकुळ अस्वल पाण्याच्या शोधार्थ फिरून पाण्याअभावी मेले असेल.
२)सराईत शिकार्यांनी तिला मारून अवयव काढून नेले असतील
३)अस्वल नैसर्गिक रित्या मृत पावूण
अंधश्रद्धेपोटी कुणी दात व नखे काढून नेली असतील.

सदर अस्वल चा मृत्यू हा नैसर्गिक दिसत असून तिची काही नखे व दात मात्र गायब दिसून आले.नुकत्याच शिकार झालेल्या काळवीट हरीण व हे अस्वल मृत्यू प्रकरण याने वन्यजीव व पर्यावरणास हानी पाहचली असून यापुढे तालुक्यात वन्यजीव विषयी जनमानसात आणखी जागरूकता निर्माण करावी लागेल- मंजितसिंग शिख( मानद वन्यजीवरक्षक बुलडाणा जिल्हा)

ह्याविषयीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून रीतसर नियमानुसार अस्वलास दहन पंचासमक्ष देण्यात आले
वरिष्ठ अधिकारी च्या मार्गदर्शनात तपास सुरू असून आरोपीचे व मृत्यूच्या कारणाचे शोध घेणे सुरू आहे.
-बी डी कटारिया (वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग जळगाव जामोद)

वनविभागाची भूमिका संशयास्पद
या घटने विषयी तालुक्यातील प्रसार माध्यमाचे प्रतिनिधींना ह्या मृत अस्वलाच्या छायाचित्र,व दहन देतांनाचे छायाचीत्र प्रसिद्धी साठी मगितल्यावरही सदर कार्यालयाने दि 26 च्या 3 वाजेपर्यंत कोणताही ठोस प्रेसनोट किंवा छायाचित्र प्रसिद्धीस दिले नाही, तालुक्यातील बहुतांश पत्रकार ह्या बातमीच्या माहिती व फोटोसाठी 2 दिवस कार्यालयात चकरा मारत होते तसेंच तालुका,उपजिल्हा व जिल्हा अधिकारीना फोन करत होते, परंतु हे सर्व एकाच माळेचे मणी असून माहिती दडवून काहीशे संशयस्पद व संभ्रमात्मक वातावरण यांनी बनवले.
3 वाजता एक प्रेसनोट व्हाट्सउप च्या माध्यमाने दिली तर त्यावर सही खोडलेली व शिक्काच नाही अशी दिली त्यामुळे हिरव्या कपड्याने झाकलेल्या ह्या गुप्त कार्यालयाचे कामकाज ही गूढ पद्धतीने चालते.
सम्पूर्ण तालुक्यात ह्या हरीण व अस्वलाच्या शिकार प्रकरण नि नागरिक व वणप्रेमी हादरले असून
ह्या सातपुड्याच्या कुवरदेव ते उंबरदेव हा सम्पन्न जंगल प्रादेशिक स्वरूपाचा असून या विभागात एवढ्या संख्येने वन्यजीवांची उपस्थिती कशी काय?या वनजीवांच्या संख्येस बघितल्यावर आजपर्यंत तालुक्यात मोठी प्राणी गणना का झाली नाही?अंबाबरवा अभयारण्य व मेळघाट व्याघ्रप्रकल्प चा शेजारील ह्या विभागाचा वन्यजीव म्हणून का समावेश करू नये? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.