अस्तित्व म्हणजे नेमक काय असत ? फक्त जन्माला येण आणी किडयामुंग्यासारख जीवनाचा खरा आंनद न घेता नकळत जिवनाचा धाग तुटणे याला जिवन म्हणता येणार नाही.जिवनाचा खरा आनंद मनुष्याला घेता आला पाहिजे.सगळे जिवन जगतात म्हणुन आपण जगायचे का ? आजच्या धावपळीच्या जिवनात माणुस माणसाला ओळखायला तयार नाही.जवळचे नातेवाईक,मित्रपरीवार हळु-हळु लांब होत चालले आहे.याचे कारण आपण कधी शोधण्याचा प्रयत्न केला नाही.याला सर्वात मोठे कारण म्हणजे माणासाच्या नको असलेल्या आणी वाढलेल्या अपेक्षा.दुसऱ्या व्यक्तीकडे पाहुन आपण सुध्दा आपले सुखाचे दिवस नको असलेल्या अपेक्षा व वाढलेल्या अपेक्षा पुर्ण करण्यात घालावतो.व नकळत जिवनात दुखा:चा डोगर उभा करतो.हव्यासापोटी आपण रक्ताचे नाते ,मित्रपरीवार यांना विसरुन जातो.यामध्ये जिवनाचा बराच कालावधी खर्च केल्यानंतर आपल्या काहीच अपेक्षा हया पुर्ण झालेल्या असतात.पण तो पर्यत आयुष्यातील आंनद साजरे करण्याचे दिवस हे नकळत निघुन गेलेले असतात आणी आयुष्याने तो पर्यत शेवटच्या टप्यात प्रवेश केलेला असतो अशा आयुष्याच्या शेवटच्या टप्यात आपले जवळ सगळे काही असते पण शेवटचा टप्पा माणसाला त्या पासुन दुर लोटतो.त्याचा काहीच फायदा होत नाही.मग एवढा हव्यास का ? कि जाचा आपल्याला काहीच फायदा नाही.जिवनाचा आपण खरा आनंद घेतला का.याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल तोंडुन नाही हे उत्तर येते.जिवन हे क्षणभंगुर आहे याचा विचार करुन आपल्या जवळ जे आहे त्यात समाधानी राहुन, नको असलेल्या अपेक्षा बाजुला काढुन येणारा प्रत्येक दिवस आनंदाने जगणे यातचा जिवनाचे खरे अस्तित्व आहे.
(अमोल पांडुरंग घिरके)
मु.पो.डोणगांव ता.मेहकर.जि.बुलडाणा.
9623190645