तो हसरा चेहरा .नाही कोणाला दुखावले मनाचा तो भोळेपणा ,कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण ,पुनरजन्म घ्यावा हिच आमची प्रार्थना
वार्ताहार अमडापुर :- सियाचीन येथे देशसेवेत कर्तव्यावर असलेले चिखली शहरातील वीर जवान उणे ५० °C इतक्या कमी तापमानाच्या सियाचीन सारख्या खडतर प्रदेशात वीर जवान कैलाश पवार यांनी देशाप्रती आपले कर्तव्य बजावले. त्यांच्या निधनाने देशानं एक देशप्रेमी वीर जवान गमावला आहे. आपण वीर जवानांच्या दुःखात सहभागी आहोत. देशसेवेप्रती त्यांची कटिबद्धता, देशप्रेम आणि त्याग युवा पिढीला प्रेरणा देणारा आहे.

त्याच कैलास पवार यांना आदरांजली म्हणून काल दिनांक 05/08/21रोजी हिंदुराज प्रतिष्ठान व गावातील समस्त युवक मित्र मंडळीच्या वतीने ठीक 7 वाजता श्रद्धांजली वाहण्यात आली .यावेळी गावातील जेष्ठ माजी. सैनिक एजाज पटेल सर ,कार्यरत भागवत जाधव ,सागर हरकाळ यांची उपस्थिती होती. यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला कैलास पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली .
त्यानंतर त्यांनी सैनिकाच्या त्यांच्या मनोगतात सैनिकाच्या सीमेवर चे जीवन आणि सुट्टीवर आल्यानंतर चे जीवन यातला फरक सांगितलं त्यानंतर गावात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा हिंदुराज प्रतिष्ठान च्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. या वेळी गावातले प्रतिष्ठीत नागरिक व युवक वर्ग मोठ्या संख्येनेउपस्थित होता.कार्यक्रमाच्या शेवटी हिंदुराज प्रतिष्ठान चे अध्यक्ष यांनी त्याचे मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचा शेवट केला