राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या संबंधी अपशब्द वापरणाऱ्या नराधमास अटक करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिया आंदोलन
अंबड-अंबड तालुक्यातील पांगरखेडा येथील शंकर लाला कान्हेरे या समाज कंटकाने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी व्हाट्सअप्प ग्रुपवर अपशब्द वापरल्या प्रकरणी काल दि.२८.०५.२०२१ रोजी रात्री ११ वाजून २२ मिनिटांनी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात येऊनही अंबड पोलीसांनी आरोपीस अटक न केल्या कारणाने अंबड पोलीस ठाण्यात काल रात्री १२ वाजल्यापासून सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
संबंधित समाज कंटकाने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल एका व्हाट्सअप्प ग्रुपवर आपल्या स्वतः चे आवाजामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करुन रागाने तसेच सुडभावनेने एका विशिष्ट समाजाला उद्देशून केलेले समाज घातक विद्रोही कृत्य हे अशोभनीय असल्याने तसेच या विधानाने समाजमन भावना दुखावल्या गेल्याने ताबडतोब या आरोपीस अटक करण्याची मागणी सर्व पक्षीय समाज बांधवाकडून करण्यात आली असून संबंधिताविरोधात भांदवी कलम २९४ , २९५(अ) २९८ माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.३१ रोजी होणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती पर्यंत आरोपीस अंबड पोलीसांनी अटक न केल्यास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून तसेच रास्ता रोको तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थित भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष बाळासाहेब तायडे,मनसे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने, युवा मल्हारसेनेचे प्रदेश प्रवक्ते सुरेश भावले,भीमराव नाना शिंगाडे,वकील संघाचे लक्ष्मण गायके, ज्ञानेश्वर गायके,अशोक खरात,दत्ता लोहकरे,बाबू लांडे,रामभाऊ लांडे,राजाराम खंडागळे,शिवाजी लांडे,लक्ष्मण पेदे,अनिल मिसाळ,चंद्रमनी बनसोडे ,युवासेनाचे रामशेठ लांडे, यांनी दिला आहे.