बुलडाणा, दि. 5 : अनुकंपा तत्वावर अनुकंपाधारक उमेदवारांकडून प्राप्त अर्जांची सुधारीत अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदर ज्येष्ठता यादीतील अनुकंपाधारक उमेदवारांना 12 जुलै 2021 ते 13 ऑगस्ट 2021 या कालावधीत मूळ कागदपत्र तपासणीसाठी वेळापत्रकानुसार तपासणी करण्यात येणार आहे. वेळापत्रकानुसार संबधीत अनुकंपाधारक उमेदवार यांनी कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित रहावे. वेळापत्रक व त्या संबंधीतचे पत्र जिल्हा परिषद, बुलडाणा www.zpbuldhana.gov.in या संकेतस्थळावर पाहावे व त्यानुसार सर्व संबधीत अनुकंपाधारक उमेदवारांनी वेळापत्रकानुसार न चुकता उपस्थित रहावे. याची संबधितांनी नोंद घ्यावी. याची संबंधीत यादीतील उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी कळविले आहे.