बुलढाणा येथे शासकीय कृषी महाविद्यालय ची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश पारित करावेत असे उपमुख्यमंत्र्यांना साकडे – राजीव जावळे
बुलडाणा – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजीव जावळे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील २०१७ मध्ये कृषी अनुसंधान परिषदेने मान्यता दिलेले शासकीय कृषी महाविद्यालय अजून चालू झालेले नाही. सदर महाविद्यालय चालू करण्यासंदर्भात आदेश राज्य शासनाकडून पारित करून त्याच्या पहिल्या वर्षाच्या वर्गांसाठी आवश्यक असलेला ५० लाखांचा निधी उपलब्ध करून द्यावा असे निवेदन दिले.
अजितदादांनी आपल्या स्विय्य सहाय्यक यांना या संदर्भात तातडीने डवले साहेबांशी चर्चा करण्याच्या सुचना दिल्या.
बुलढाणा येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा 2017 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती त्याच वेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्यानुसार भारतीय अनुसंधान परिषदेच्या पाचव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशीनुसार दिनांक २७/०६/२०१८ रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत अधिनस्त जागेवर बुलढाणा येथे अनुदानित घटक कृषी महाविद्यालय स्थापन करण्याच्या संदर्भात प्रस्तावास मान्यता देण्यात आली .
बुलढाणा येथे 130 एकर जमीन उपलब्ध असल्याने तसा परिपूर्ण प्रस्ताव कृषी परिषदेच्या ठरावासह राज्य शासनाकडे 2018 मध्ये सादर करण्यात आला तरी सदर प्रस्तावास मान्यता देण्यात यावी . कृषी महाविद्यालयाचे प्रथम सत्राचे वर्ग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली प्रशिक्षित मनुष्यबळ ,शेत जमीन ,इमारत तसेच राहण्यासाठी वस्तीगृह या सर्व बाबी बुलढाणा येथील शासकीय कृषी संशोधन केंद्र, कृषी विकास केंद्र व कृषी तंत्र विद्यालय येथे उपलब्ध आहे महाविद्यालयाला प्रथम वर्षाचे वर्ग चालू करण्यासाठी साधारणतह रुपये ५० लाख रुपयांच्या निधीची गरज आहे.
सदरचा निधी या महाविद्यालयाला उपलब्ध करून प्रथम वर्षाच्या प्रवेशाची मान्यता दिल्यास हे महाविद्यालय बुलढाणा येथे येणाऱ्या सत्रात चालू होऊन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नवीन दालन उपलब्ध होईल तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी बुलढाणा शहरात शिकण्यासाठी आल्याने शहरात नवीन रोजगार उपलब्ध होईल .
अशा प्रकारचा अर्ज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजू जावळे यांनी दिला अजितदादा यांनी आपल्या स्वीय सहाय्यक डवले साहेब यांना या संदर्भात तातडीने चर्चा करण्याच्या सूचना दिल्या व या प्रकरणाची दखल घेत याचा पाठपुरवठा करण्यास पाच वर्ष का लागले असे सुद्धा आवर्जून अजितदादांनी विचारले.अजितदादांच्या कार्यतत्परते मुळे आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालक मंत्री आदरणीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या पाठपुराव्याने बुलढाणा येथील कृषी महाविद्यालय लवकरच मार्गी लागेल असे राजीव जावळे यांनी मातृतीर्थ live शी बोलतांना दिल्या .