1) गेल्यावर्षी नियमित वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे अनुदान घोषित केले. पण लागू करता आले नाही. ते या वर्षापासून सुरु करु 2) हळद पीकासाठी 100 कोटींचा विषेश निधी 3) कापूस आणि सोयाबीनसाठी 1000 कोटींचा विशेष निधी 4) शेततळ्याचे अनुदान 75000 वर नेण्यात येत आहे 5) गोसीखुर्द प्रकल्पासाठी 853 कोटी 6) येत्या तीन वर्षात आरोग्यसेवा वाढवण्यासाठी 11 हजार कोटी खर्च करणार 7) 60 रुग्णालयात मोतीबिंदूसाठी फेको हे नवे तंत्रज्ञान आणले जाईल 8) जालनामध्ये मनोरुग्णालय उभारणार 9) प्रत्येक जिल्ह्यात टेली मेडिसीन सुरु करणार 10) टाटा कॅन्सरला औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी 10 हेक्टर जमीन देण्यात येत आहे
11) राज्यातील आरोग्य विभागाला 3364 कोटी रुपये 12) वैद्यकीय पदव्युत्तर संस्था उभारणार, 100 खाटांची महिला रुग्णालये तयार करणार 13) येत्या वर्षात 1200 कोटींनी रुग्णालय खांटांची संख्या वाढवणार (राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम; आज पुण्यासह 9जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा) 14) वैद्यकिय शिक्षणासाठी 2061 कोटी रुपयांची तरतूद 15) स्टार्टअप योजना कौशल्य विकास योजनेसाठी 615 कोटी रुपयांची तरतूद 16) मुंबई विद्यापीठ कलिना परीसरात आंतरराष्ट्रीय लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद 17) प्रत्येक जिल्ह्यात इनोव्हेशन हब तयार करणार, गडचिरोलीत 5000 विद्यार्थ्यांना दरवर्षी कौशल्य वर्धनासाठी 30 कोटी रुपये 18) गटार सफाई करण्यासाठी स्वयंचलीत यंत्र आणलं जाणार 19) उच्च व तंत्रज्ञान विभागासाठी 1619 कोटी रुपयांची तरतूद 20) सफाई कामगारांना यापुढे गटार स्वच्छ करण्यासाठी स्वयंचलिय यंत्र
21) तृतीय पंथियांना ओळखपत्र आणि शिदापत्र दिले जातील 22) अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद 23) 11 हजार 199 कोटी रुपये आदिवासी विकास कल्याण निधी 24) गडचिरोलीत माडिया भवन उभारणार 25) सामाजिक कल्याण विभागाला 3000 कोटी रुपये 26) 1 लाख 20 हजार आंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले जातील 27) महिला व बालकल्याण विभागाला 2472 कोटी रुपये दिले जातील 28) एसआरएच्या धर्तीवर मुंबईबाहेर झोपड्यांच्या दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपये 29) ग्राम विकास मंत्रालयाला 7718 कोटी रुपये 30) ग्रामीण भागात 6550 किमीचे रस्ते बांधले जातील
31) कोकण सागरी महामार्गासाठी 500 कोटी रुपये 32) समृद्धी महामार्गाचे ७७ टक्के काम पूर्ण. हा महामार्ग पुढे गडचिरोली गोंदीयापर्यंत वाढवण्यात येणार आहे. 15773 कोटी रुपये MSRDC ला रस्ते विकासासाठी देणार 33) वसई, भाईंदर जलमार्गाने जोडणार, त्यासाठी 330 कोटी रुपयांची तरतूद 34) मुंबई मेट्रो 3 लाईन नेव्हीनगरपर्यंत विस्तारणार 35) शिवडी नाव्हाशिवा प्रकल्पाचे 64 टक्के काम पूर्ण 36) 3000 पर्यावरण पूरक बस पुरवणार 37) शिर्डी विमानतळावरुन मालवाहतूक सुरु करणार 38) ST महामंडळासाठी 3003 कोटी रुपये 39) नगरविकास विभागाला 8 हजार कोटी 40) रत्नागिरी, नांदेड, कोल्हापूर विमानतळांना आर्थिक सहाय्य, गडचिरोली विमानतळ प्रस्तावीत,
41) राज्यात 2 लाख कोटींची गुंतवणुक अपेक्षित असून त्यामुळे रोजगारही वाढणार आहे. राज्यात 1 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील. 42) आदिवासी उद्योजिक क्लस्टर नाशिक येथे उभारणार 43) आदिवासी समाजातील नव उद्योजकांसाठी नाशिक इथे नवे क्लस्टर उभारले जातील. 44) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना सुरू करण्यात येत आहे. 45) कोकण चक्रिवादळ प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी 3200 कोटी रुपयांची तरदूत 46) कोयना धरण परीसरात जल पर्यटन, गोसीखूर्द धरण परीसरात जल पर्यटन, पालघर जव्हार येथील पर्यटक स्थळांना ब गटाचा दर्जा, अजिंठा-वेरुळमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक पर्यटन विकास प्रकल्प उभारणार 47) सागरी किल्यांसाठी विशेष निधी 48) छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्यांना जागतिक वारसा घोषीत करण्यासाठी युनायटेड नेशन्सकडे पाठपुरवठा करणार 49) 1704 कोटी रुपये पर्यटन विकास चालनासाठी
50) 6 किल्यांसाठी 6 कोटी रुपये देणार 51) लोणावळ्यात स्कॅाय वॅाक सुरु करणार, राज्यातील इतर जिल्हात हेरीटेज वॅाक सुरू करणार 52) शिवभोजन योजनासाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयास 300 कोटी रुपये. 53) गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसाठी विशेष रुग्णालय उभारणार 54) गृह विभागाला 1000 कोटी रुपये 55) सारथी संस्थेला 250 कोटी रुपये 56) राज्याच्या वन क्षेत्रात 20 किमीची वाढ 57) वन विभागाला 1095 कोटी रुपये देणार व्याघ्र संरक्षण केंद्र उभारणार जनुक कोष प्रकल्पाला भरिव तरतूद पुण्यात बिबट्या सफारी सुरु करणार 58) मुंबईत मराठी भाषा संशोधन केंद्र सुरू करणार, त्यासाठी 100 कोटींची तरतूद 59) मराठी भाषा अभिजात दर्जा विकास संवर्धनासाठी 100 कोटी रुपये. गुडीपाढव्याला मरीन ड्राईव्ह येथे मराठी भवनचा शुभारंभ होईल 60) नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारणार त्यासाठी 100 कोटींची तरतूद 61) CNG वरचा टॅक्स 13.5 टक्याहून 3 टक्यावर येणार 62) पुढील तीन वर्षासाठी वस्तू, पाळीव प्राणी यांच्या जल वाहतुकीच्या कराला माफी