मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोडुसर यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोस्तव मोठ्या उत्साहात साजरा .
आज दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजी मलकापूर येथे तालुका कृषी अधिकारी व मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोडुसर यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोस्तव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन मा.पं.स. सभापती नलिनीताई तळोले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण राउत तालुका कृषी अधिकारी हे होते तर प्रमुख उपस्तिथी मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोडुसर कंपनीच्या अध्यक्षा सौ. ज्योस्ना प्रशांत तळोले ह्या होत्या. प्रमुख उपस्थित जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीचे सी.ई.ओ. अमित भाऊ नाफडे पं.स.चे कृषी अधिकारी संदीप कोस्केवार आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जवाहर देशमुख ,ज्ञानदेव हिवाळे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रानभाजी महोस्तव मेळाव्यामध्ये तालुका कृषी अधिकारी नारायण राउत यांनी उपस्थितांना माहिती दिली कि आज रोजी आपणाला जीवनामध्ये निरोगी राहायचे असेल तर आपण रानभाजी कडे वळायला पाहिजे कारण रानभाजी हे कीटकनाशक मुक्त भाज्या आहे.तसेच त्यांनी, तरोटा, करटोली बांबू भाजी, फांजीची भाजी, रान भेंडी, अंबाडी आणि उंबर इद्यादी. भाजी विषयी माहिती दिली यानंतर अमितभाऊ नाफडे यांनी सांगितले आपण जिवनामध्ये रानभाजी कडे वळायला पाहिजे, त्यामुळे आपणाला आरोग्य चांगले व रोगप्रतिकार शक्ती वाढेल. यानंतर सौ. ज्योस्ना तळोले यांनी सांगितले
विशेष महिलांनी या रानभाजी कडे वळायला पाहिजे, कारण आज समाजात महिलांचे घरामध्ये भाजीची निवड करतात, नंतर जवाहर देशमुख, ज्ञानदेव हिवाळे, नलिनीताई तळोले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये रानभाजी महोस्तवामध्ये विविध महिला बचत गटाने रानभाजी आणल्या होत्या. कार्यक्रमाच्या प्रस्ताविक प्रशांत तळोले यांनी तर संचालन ज्ञा.ना.हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रविण वाघोदे यांनी केले.
या प्रसंगी उपस्थित महिलांपैकी लकी महिला सौ .कल्पना चोपडे यांना कंपनी तर्फे साडी,चोळी व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी साठी अक्षय सपकाळ, डॉ. जे.एल.पाचपांडे,ज्ञानदेव सातव, ,विलास खर्चे , श्रेयश तळोले,जयेश तळोले यांनी परिश्रम घेतले.