गजानन सोनटक्के जळगाव जा.तालुका प्रतिनिधी :- लॉकडॉऊनमध्ये सर्व शैक्षणिक आस्थापने, शाळा, महाविद्यालय बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांचे देखील वर्क फ्रॉम होम या पद्धतीने कार्य चालू आहे. याच पाश्र्वभूमीवर स्वा. वि. गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील कृषिदूतांनी शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन कार्यशाळा आयोजित केली.
यादरम्यान विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती, तांत्रिक शेती तसेच जैविक शेती याबाबत माहिती पटवून दिली . सदर कार्यशाळा सदन कास्तकार समाधानभाऊ बगाडे यांच्या बांधावर घेण्यात आली. या कार्यशाळेचे आयोजन साक्षी इंगळे, वैष्णवी आटोळे,प्रगती मुळतकर, सोमल घोगरे या विद्यार्थ्यांनि केलें.तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उद्यानविद्या महाविद्यालयातिल प्राचार्य वाय आर गवई सर, उपप्राचार्य एस एस धर्माळ सर,ए डी सुने सर , जे आर साळी सर व समुपदेशक पी एस वानखडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.