देऊळगाव माळी रवींद्र सुरूशे – देऊळगाव माळी व परिसरात सध्या सर्वच शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपून तन नाशक फवारणी सुरु आहे. तन नाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. नाहीतर आपल्या थोड्याशा चुकीने उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. असाच थोड्या चुकीमुळे देऊळगाव माळी येथील ज्ञानेश्वर सुरूशे, यांची तीन एकर मधली सोयाबीन तर अनंता सुरूशे यांच्या एक एकर शेतातील मुग याची दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. या शेतीचा आज कृषी सहाय्यक गवई ,तलाठी पऱ्हाड, यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामा केला. व सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागात मार्फत आव्हान केले आहे की तन नाशक फवारणी करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. किंवा कोणतेही पिकावर औषध फवारणी करताना पंपाची टाकी गढूळ पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. तसेच औषध फवारणी करताना स्वच्छ पाणी वापरावे अशा प्रकारच्या सूचना यावेळी गवई यांनी दिल्या.
Related Posts