समृद्धी महामार्गाच्या कामामुळे झालेल्या शेतकऱ्यांची नुसकान तात्काळ भरपाई द्या – आमदार डॉक्टर संजय रायमुलकर
मेहकर प्रतिनिधी रवींद्र सुरूशे – तालुक्यातील असंख्य शेतकरी या नियोजनशून्य कारभारामुळे बाधित झाले आहेत .सध्या समृद्धीमहामार्ग काम सुरू आहे. पावसाळा सुरू झाला आहे. हे ओळखून कंत्राटदाराने आवश्यक त्या उपाययोजना करायला हव्या होत्या. मात्रन केल्याने व दोन दिवसापूर्वीमुसळधार पाऊस झाल्याने पुलाच्या मो-या बंद,बांध टाकणे, नाले मोकळे न करणे यामुळे सर्व पाणी जवळपासच्या शेतात गेले व जमिनीचे,पिकांचे नुकसान झाले. पुढील महिनाभर तरी शेतकरी पेरणी करू शकणार नाही अशी परिस्थिती आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्यानुकसानीची भरपाई कंत्राटदाराकडून घेण्यात यावी अशी मागणी यावेळी आ.रायमुलकर यांनी केली. तसेच तहसीलदार व कृषी विभागाला सर्व्हे चे निर्देश दिले .तसेच याआधी धुळीमुळे झालेल्या नुकसानीची सुध्दा शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने ती सुध्दादेण्यात यावी असेही आ.रायमुलकर म्हणाले.यावेळी दौऱ्यात तहसीलदार डॉ. संजय गरकल,तालुका प्रमुख सुरेश वाळूकर,कृषी अधिकारी किशोर काळे,कृषी सेवक समाधान कंकाळ,माजी सरपंच विठ्ठल मिस्कीन,फैजलापुर सरपंच मदन गाडेकर,ग्रामपंचायत सदस्य गजानन सातपुते, अशोक गाडेकर,राजू मिस्कीन, गवंढाळा सरपंच गजानन जाधव व महसूल,समृद्धी महामार्गअधिकारी उपस्थित होते.