चिखली रवींद्र सुरुशे – अमडापूर तालुका चिखली येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेली बल्लाळ देवी ने काल रात्री नऊ वाजताच्या दरम्यान आपल्या खऱ्या रूपाचे दर्शन भाविकांना दिले.अमडापूर येथे बुलढाणा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले बल्लाळ देवी संस्थान आहे. कित्येक वर्षापासून ही देवी माता डोंगरावर वास्तव्यास आहे. भाविकांची मनोकामना पूर्ण करणारी देवी माता म्हणून जिल्ह्यात नावारूपास आहे. या देवीचा खूप मोठा प्राचीन इतिहास आहे. अशा देवी मातीने रात्रीला आपल्या खऱ्या रूपाचे दर्शन भाविकांना दिले.सविस्तर वृत्त असे की, काल रात्री नऊच्या सुमारास बल्लाळ देवी मातेच्या मूर्तीवरील शेंदुराची खोळ आपोआप निखळली व आत मधून सुंदर प्रसन्न मुद्रेतील मूर्ती साक्षात महालक्ष्मीच्या रुपात भाविकांना दर्शन देण्यासाठी प्रगटली.आता सध्या त्या मूर्तीची संस्थानचे अध्यक्ष वल्लभराव देशमुख व विश्वस्त मंडळी यांनी जुन्या मुद्रेची गावामधून भागवत धर्मानुसार प्रदक्षिणा काढण्यात आली.
या वेळी संपूर्ण गावांमधून माता भगिनींनी दुःख नयन अश्रूंनी यावेळी पूजन केले. व शेवटी ब्राह्मणवाडा धरणात विधीवत विसर्जन करून देवीने दर्शन दिलेल्या मूळ मूर्तीची अभिषेक व पूजन करून शेंदूर लेपन केले. त्यानंतर समोर आले ते माऊली ची नवीन व मोहक महालक्ष्मीचे रूप. आता देवी मातेने धारण केलेली नवीन रूप भाविकांना दर्शन देत आहे. या घटनेविषयी संस्थानचे अध्यक्ष वल्लभ राव देशमुख व विश्वस्त यांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बारकाईने चेक करूनकाही समोर येते का हे बघितले. परंतु ज्या वेळेस देवी रूप बदलते त्या अगोदर काही क्षण मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यां मध्ये हा क्षण दृश्य रुपात रेकॉर्डिंग झाला नाही. हाही एक चमत्कारच म्हणावा लागेल.