गजानन सोनटक्के जळगांव जा – शहरातील अवैध्य धंदे बंद करण्या बाबत भाजपा,युवा मोर्चच्या वतीने उपविभागीय अधिकारी ज,जा,यांचे मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे निवेदन सादर केले,उपविभागीय अधिकारी जळगाव जा, यांचे मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा यांना भाजपा युवा मोर्चा जळगाव शहर अध्यक्ष उमेश चिंतामण जी येऊल यांनी दिनाक ,11/8/2021 निवेदन दिले
,निवेदनात नमूद केले की शहरात सर्सास पणे अवैध्य देशी विदेशी दारू गावठी दारू, वरली मटका,घुटका पुडी व इतर अवैध्य धंदे सुरू असून गल्लो गल्ली मद्ये अवैध्य धंदे वाल्याचे थैमान सुरू आहे,प्रत्येक चौकात व शहराची शान असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, ,मानाजी चौक, दुर्गा चौक, जुने बस स्टँड,नवीन बस स्थानक परिसरात खुले आम अवैध्य धंद्याचे साम्राज्य सुरू केले आहे, अवैध्य धंद्याचे साम्राज्य राजकीय पक्षांच्या नेत्यांक्या वरद हस्ताने सुरू असल्याचे चर्चिले जात आहे, तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी याचा सुद्धा वारली मटक्याच्या धंद्यात समावेश आहे असेही परिसरातील नागरिक चर्चा करत आहेत,
,सुरू असलेल्या अवैध्य धंद्या मुळे,शहरात येणाऱ्या महिला ,विद्ध्यार्थिनी, विद्यार्थी, यांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे,त्यातच युवा वर्ग व विध्यार्थी सुद्धा वाम मार्गाने जात व्यसनाधीन होत असल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत,अवैध्य धंद्यामुळे अनेक कुटुंब उदात्त झाली आहेत त्यामुळे शहरातील अवैध धंदे बंद करून संबंधितावर कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ,भाजपा युवा मोर्चा ने दिलेल्या निवेदनातून देण्यात आला,निवेदनावर उमेश चिंतामण जी येउल,प्रिक्षित ठाकरे,अजय वंडले,रोहित सरपा,ज्ञानेवर कोथळकर,यांच्या सह 13, पदाधिकारी यांच्या साह्य आहेत,निवेदनाच्या प्रती जळगाव जा, पोलिस स्टेशनला दिली,