प्रतिनिधी सचिन मांटे किनगाव राजा – कार आणि सिमेंट मिक्सर ट्रक चा समोरा समोर अपघात होऊन 65 वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार झाली तर लोणार तालुल्यातील एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहे . अपघात होताच ट्रक चालक फरार झाला आहे . सदर घटना राहेरी किनगाव राजा रोड वरील नायरा पेट्रोल पंपाजवळ आज 5 सप्टेंबर च्या दुपारी चारच्या सुमारास घडली सौ उज्वला मुकुंदराव देशमुख राहणार गाडगेनगर अमरावती वय वर्ष 65 असे ठार झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

सौ आशा अशोक सानप वय 54 वर्ष , डॉक्टर निलेश अशोक सानप वय 38 वर्षे ,आदिती निलेश सानप 32 वर्ष ,प्रशांत निलेश सानप आठ वर्ष ,आवेश निलेश सानप व एक वर्ष सर्व राहणार कटकेश्वर तालुका लोणार अशी जखमींची नावे आहेत सानप परिवार हा देऊळगाव राजा येथून बालाजी मंदिरात अभिषेक करून लोणारला कार क्रमांक ( MH 20 CA 403 ) ने परतत होता नायरा पेट्रोल पंपाजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रक क्रमांक MH04 EY 3374 यांच्या कारचा अपघात झाला धडक एवढी जबर होती की कार आणि मिक्सर हे दोन्ही वाहने क्षतिग्रस्त होऊन रस्त्याखाली आली
घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे, पोलीस नायक महादेव साळवे ,पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर गवळी ,बीट जमादार राजू दराडे, श्री बनसोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले अपघातानंतर ट्रकचालक यांनी वाहन तसेच सोडून पळ काढला हे वाहन मुंबईच्या यादव नावाच्या व्यक्तीच्या नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी च्या हवाल्याने कळते आणि घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.