Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

तीन दुचाकीस्वारांच्या विचित्र अपघातात एक गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाले

ACCIDENT

गजानन सोनटक्के जळगाव जा – जळगाव जामोद : समोरा समोर तीन मोटरसायकलची धडक होऊन त्यामध्ये एक गंभीर व दोन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजता च्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील गोराळा धरणाजवळ घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की बुऱ्हाणपुर वरून गोकुलदास गवई मोटरसायकल क्रमांक(1) MH28 5549 व दुसरी मोटरसायकल क्रमांक (2 )येत होते तेव्हा सूनगावावरून मोटरसायकल क्रमांक( 3 ) mh30 294 ही येत असताना धरणाजवळ मोटरसायकल क्रमांक तीनच्या धारकांनी मोटरसायकल क्रमांक दोन ला धडक देऊन मोटरसायकल क्रमांक एक ला सुद्धा धडक दिली.

या मधील मोटरसायकल क्रमांक दोन जागेवरून फरार झाला तर मोटरसायकल क्रमांक तीन वाहनधारक हा गंभीर स्वरूपात जखमी झाला मोटरसायकल क्रमांक एक मधील दोन्ही व्यक्ती हे किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती पोलीस पाटील तडवी यांना मिळताच त्यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला या बद्दल माहिती दिली माहिती मिळताच जळगाव पोलिस स्टेशनचे पीएसआय प्रल्हाद मदन घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सर्व जखमी व्यक्तींना पोलीस गाडीमध्ये ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे नेले तेथे गंभीर व्यक्तीची ओळख पटली सदर व्यक्ती कालमाठी येथील देवसिंग डाबर आहे सदर व्यक्‍तीची प्रकृती खराब असल्या कारणाने त्याला खामगाव येथे रेफर करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.