युवासेना जिल्हाध्यक्ष श्री. ॠषी जाधव यांच्याकडून विवेकानंद कोविड हॉस्पिटल रूग्णांना सॅनेटायझर, मॉस्कचे वाटप
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा विळखा संपूर्ण जगाला बसला आहे. कोरोना विषाणूचा संपूर्ण मानवी जीवनावर परिणाम झाला आहे. मास्क,सॅनेटायझर व सोशल डिस्टसिंग या त्रिसूत्रीने कोरोना विषाणूचा सामाना करता येतो. कोरोनाच्या काळात सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठी विवेकानंद आश्रमाने विवेकानंद कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. शासनाच्या दरपत्रकापेक्षा कमी दरात या ठिकाणी कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. आश्रमाच्या कोविड हॉस्पिटलमधून कोरोना मुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण शंभर टक्के आहे.
आज युवा समाजसेवी श्री.ॠषी प्रतापराव जाधव यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विवेकानंद कोविड हॉस्पिटलसाठी सॅनेटायझर, मास्कचे रूग्णांना वितरण करीत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी विवेकानंद आश्रमाच्या वतीने आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पू.महाराजश्रींचे ग्रंथ भेट देवून त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी निरज रायमूलकर तथा युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.