गजानन सोनटक्के जळगाव जा
राज्यातील बहुतांशी जिल्हामध्ये पिक आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असल्यांने अशा परिस्थितीत यापूर्वी शासनाने दिल्याप्रमाणे सरसकट प्रत्येक शेतकर्याला पिक विमा मिळाला पाहिजे. या अनुषंगाने सर्व पिकविमा कंपन्यांना आपण आदेश करावे. त्याचप्रमाणे वरील निकष उपयोगात आणून हेक्टरी 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान सरसकट देण्यात यावे. गेल्या आठवड्यात आलेल्या चक्रीवादळामुळे भालेल्या तुकसानाचे पंचनामे त्वरित करावे व झालेल्या पंचनाम्याप्रमाणे तात्काळ भरपाई मिळवून देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आ.डॉ.संजय कुटे यांनी 24 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील शेतकर्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा खरीप हंगाम सुरु होत आहे. सध्या कोरोना महामारीमुळे व नुकत्याच झालेल्या अनेक नैसर्गिक संकटानि हैराण करून ठेवले आहे. खरीपच्या नियोजनात बि-बियाणे, खाते, औषधी, सिंचन व्यवस्था व अत्य प्रकारच्या नियोजनासाठी आर्थिक अडचणी निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोरोना महानारीमुळे राज्यभरातील बहुतांश दुय्यम कार्यालये बंद असल्यामुळे बँकांकडून कर्ज पुरवठा होणे बंद झाले आहे.यावरील निर्बंध शिथिल केल्यामुळे शेती तारण व्यवस्था सुरळीत होऊन कर्ज पुरवठा होऊ शकेल. त्याचप्रमाणे बँका फक्त 3 तासच काम करत असल्यामुळे सध्या त्यांची प्राथमिकता फक्त दैनिक व्यवहारापुरधीच असून कर्ज प्रकरणे करणे बंद आहेत. त्यांना पूर्णकालींन काम करण्यास मुभा मिळाल्यास पिक कर्ज प्रकरणे त्वरित होतील व शेतकर्याचि समस्या सुटेल. याप्रमाणे कार्यवाही त्वरित झाल्यासं अन्य खरीप हेगामाच्या तोंडावर अडचणीत आलेल्या आपल्या राज्यातील शेतकर्यांना भरीव मदत मिळून देता येईल तरी उपरोक्त मुद्दयांवर गंभीरतेने विचार करून शेतकर्यांना न्याय मिळवूत द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात अली आहे.