सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांची शैक्षणिक फी माफ करण्या बाबत भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन…
जळगांव जा.तालुका प्रतिनिधी गजानन सोनटक्के :- गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून कोरोनाने थैमान घातले असून मागीलवर्षा पासून सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे.त्यात पालक वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे .त्यात सर्व माध्यमांचा शाळा हे ऑनलाइन रित्या चालू असुन .काही शैक्षणिक संस्थेचा शाळा व कॉलेज कडून पालक व पाल्याला शाळेकडून वारंवार फी भरण्यासाठी फोन किंवामॅसेज करत आहे तरी शासनाने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने मागील सत्र 2020-2021सत्र -2021 -2022 ह्या सत्राची फी माफ करावि .यासाठी मा. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले .सदर निवेदन देते वेळी वैभव अढाव जिल्हा सरचिटणीस विद्यार्थी,किर्तेश अग्रवाल जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी आघाडी आघाडी,आशिष सारसर नगरसेवक ,गौरव डोबे सदस्य भाजपा हे उपस्थित होते. भा. ज.पा.जिल्हाद्यक्ष युवा मोर्चा सचिनबाप्पू देशमुख ,अभिमन्यू भगत शहराध्यक्ष भाजपा.निलेश शर्मा नगरसेवक जळगाव जामोद, परीक्षित ठाकरे ,प्रकाश वाघ तालुकाध्यक्ष भाजपा, जळगाव जामोद, परीक्षित ठाकरे तालुकाध्यक्ष युवा मोर्चा ,उमेश येऊल शहर अध्यक्ष युवा मोर्चा,रामा इंगळे सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती हे उपस्थित होते.