बँकांनी शेतकऱ्यांना पिक कर्ज द्यावे ,शेतकऱ्यांनी कर्जमाफी , वीजबिल माफी या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी – घोषित कर्जमाफी देण्यास सरकार कटिबद्ध मात्र करोनामुळे राज्याच्या विस्कटलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील पाच वर्ष तरी नवी कर्जमाफी नाही . एकंदर राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी कर्जमाफी , वीजबिल माफी या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले . सर्व बँकांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज वाटप करावे प्रत्येक गावातील ग्रामसेवक कृषी अधिकारी तलाठी यांनी या कामासाठी मदत करावी .
तसेच सर्व बँकांनी आपल्या बँकेच्या दर्शनी भागावर कर्ज वाटप माहिती असलेले बोर्ड लावावे जेणेकरून शेतकऱ्यांना सविस्तर माहिती मिळेल व पीक कर्जासाठी त्यांना विलंब होणार नाही शेतकऱ्यांना 100 टक्के पीक कर्ज द्यावे असे प्रतिसाद राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी तारीख 12 जून रोजी पंचायत समिती सिंदखेड राजा येथे सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघातील सर्व बँक मॅनेजर अधिकारी कर्मचारी यांच्या आढावा बैठकीत बोलताना उपरोक्त प्रतिपादन केले याप्रसंगी सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघातील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ,महाराष्ट्र बँक , विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँक ,आय सी आय बँक तसेच इतर सर्व बँकांची मॅनेजर कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी तहसीलदार सुनील सातव गटविकास अधिकारी देव गुनावत तसेच मतदार संघातील महसूल कर्मचारी खरेदी विक्री संघ कर्मचारी पंचायत समिती कर्मचारी पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच सर्व विभागातील कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.