जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीची चौकशी करा.समाजवादीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन..

गजानन सोनटक्के जळगाव जा -जळगाव जा व संग्रामपूर तालुका तसेच मोताळा व खामगाव येथील सर्व आरा मशीन मध्ये विनापरवाना माल तसेच अवैध वृक्षतोडीची पूर्ण चौकशी करून कारवाई करावी. तसेच जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील झाडांची मोठ्याप्रमाणात विनापरवाना वृक्षतोड होत असून त्या मालाची सर्रास वाहतूक दोन्ही तालुक्यांमधून होत असून हा माल दोन्ही तालुक्यातील सर्व आरा मशीनवर मोठ्याप्रमाणात विनापरवाना मालाची कटाई होताना दिसत आहे. या संबंधित आर.एफ.ओ यांनी स्वतः आरा मशीन वर जाऊन चौकशी करून योग्य ती कारवाई करावी तसे न केल्यास समाजवादी पार्टी संग्रामपूर तथा जळगाव जामोद तालुक्यामध्ये लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल अशा आशयाचे निवेदन समाजवादी पार्टी बुलढाणा च्या वतीने आज दिनांक 11 जून रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद यांना देण्यात आले आहे. सदर निवेदन देतेवेळी बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख शेख सईद शेख कदीर, जिल्हाध्यक्ष अजहरउल्ला खान. जळगाव शहराध्यक्ष सय्यद नफीस शेख मजहर,महासचिव बुलढाणा जिल्हा लियाकत खान यांची यावेळी उपस्थिती होती