MHT-CET-2021 प्रवेशपरीक्षा अर्ज भरणे सुरु झाले आहे . B.E. /B.Tech, B. Pharmacy, B.Sc.Agriculture प्रथमवर्ष प्रवेशासाठी आवश्यक प्रवेश परिक्षा म्हणजेच एमएचटी.सीईटी २०२१ प्रवेश परिक्षेच्या आँनलाईन अर्जची नोंदणी आज पासून सुरू होते आहे अशी माहिती तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करून दिली. ही आँनलाईन अर्जांची नोंदणी दि. ०८/०६/२०२१ ते दि. ०७/०७/२०२१ पर्यंत सुरू राहील.
अर्ज करतांना ही कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे आहेत.
१)छायाचित्रण व्हाइट पार्श्वभूमी
२)व्हाईट प्लॅन पेपरवर काळ्या शाई बॉल पेन मध्ये सही
३)एसएससी बोर्डाचे प्रमाणपत्र
४)आधार कार्ड किंवा पॅन
५)कास्ट वैधता प्रमाणपत्र / लागू पावती
६)नाही क्रेमीलेअर प्रमाणपत्र किंवा लागू पावती
७) बँक पासबुक
सदरील परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज ,नोंदणीचे वेळापत्रक व माहितीपुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . याची सर्व संबंधित विद्यार्थी,पालक व संस्था यांनी नोंद घ्यावी व अधिक माहितीकरिता www.mahacet.org या संकेस्थळास भेट द्यावी .