गजानन सोनटक्के जळगाव जा . प्रतिनिधी :- भारतीय जनता पक्षाचे केंद्रामध्ये मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक पंचवार्षिक पर्व होऊन दुसऱ्या पंचवार्षिक पर्वातील दोन वर्ष पुर्ण झाले आहे . एकूण सात वर्षे पूर्ण झाली आहेत या काळात मा.पंतप्रधानांनी देशहिताचे अनेक निर्णय घेऊन देशासाठी एक आदर्श पंतप्रधान कसा असतो याचे एक उत्तम उदाहरण सर्व जनतेसमोर ठेवले आहे या देशसेेवेसाठी भारतीय जनता पक्षा च्या सर्व लोकप्रतिनिधी , पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अभिमान आहे.
या कोरोना महामारीच्या काळात कुठल्याही प्रकारचा आनंद व्यक्त न करता कार्यकर्त्यांना सेवा सप्ताहाचे आयोजन करून जे या कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देत आहेत अशा फ्रंट लाईन वर्कर्स तसेच सफाई कामगार, कोव्हिड सेंटर मध्ये सेवा देणाऱ्या नर्स ताई यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानून त्यांचा उत्साह वाढवून त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत या सप्ताह मध्ये भारतीय जनता पक्षाचे मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना ७ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल ,महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री स्व.भाऊसाहेब जी फुंडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त व अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त तसेच स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय यांच्या सूचनेनुसार सेवा सप्ताह करण्याचे आवाहन करण्यात आले आहे . सर्व भाजपा कार्यकर्त्यांना प्रत्येक गावातील फ्रंट लाईन वर्कर्स तसेच सफाई कामगार , आशा वर्कर्स,डॉक्टर, नर्स,ग्रामीण रुग्णालयातील इतर कर्मचारी यांचा सत्कार करून गरजू पेशंटला मदत करावी ही विनंती . या कार्यक्रमाला जळगाव जामोद च्या नगराध्यक्षा सौ.सिमाताई डोबे,नगर परीषद सदस्य रत्नप्रभाताई खिरोडकर,जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन बापू देशमुख,शहर अध्यक्ष श्री अभिमन्यू भगत,युवा मोर्चा शहर अध्यक्ष उमेश येऊल, महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ.शिल्पाताई भगत ,न.प. सदस्य आशिष सारसार ,कैलास डोबे, अरुण खिरोडकार, प्रकाश बगाडे ,पकंज देशमुख ,अमोल भगत,वैभव जाधव ,सचिन कल्यानकर व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.