रवींद्र सुरुशे
मेहकर,
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील ट्रान्सफर जळाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन गेल्या पाच दिवसापासून गाव अंधारात असून पावसाळ्याचे दिवस सुरु होत असताना गावातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
वेळोवेळी विद्युत कंपनीच्या अधिकार्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करून गावकऱ्यांनी विनंती केली परंतु विद्युत कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याने आज चार जून रोजी शेलगाव देशमुख येथील नागरिक यांनी कनिष्ठ अभियंता डोणगाव यांना निवेदन देऊन आपण उद्या 5 जुन रोजी एक वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा विद्युत उपकेंद्राला आग लावण्यात येईल अशा प्रकारचा इशारा दिला आहे यावेळी शेलगाव देशमुख येथील ग्रामपंचायत सदस्य पती विनोद खंडारे,माजी सदस्य दशरथ सदार ,भारत सदार ,सदस्य दिलीप गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रहीम भाई,विष्णु आखरे सह गावकरी उपस्थित होते