सुनगाव येथील रोहित झंवर चे सुयश
गणित विषयात 100 पैकी 100 गुण
गजानन सोनटक्के जळगाव जा
सीबीएससी दहावी परीक्षेचा निकाल 12 मे रोजी जाहीर झाला असून जळगाव जा येथील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाचे 109 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या ज्ञानपीठाने शंभर टक्के निकालाची परंपरा तिसऱ्या वर्षीही कायम ठेवली आहे यावर्षी उत्तीर्ण झालेल्या सर्व 109 विद्यार्थ्यांमध्ये 95 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे चार विद्यार्थी असून 90 ते 95 टक्के गुण 20 विद्यार्थ्यांना मिळाले तर 80 ते 90% गुण 25 70 ते 80 टक्के 29 60 ते 70 टक्के गुण 20 विद्यार्थ्यांना मिळाले उत्कृष्ठ निकालाची परंपरा स्वामी विवेकानंद राष्ट्रीय विद्यापीठाने या वर्षी सुद्धा कायम ठेवले आहे 95 टक्के पेक्षा जास्त गुण घेणाऱ्यांमध्ये सुनगाव येथील रोहित दीपक झंवर याने आपल्या बुद्धिकौशल्याचा वापर करीत परीक्षेत 96.40% गुण संपादित केले आहे व विशेष म्हणजे रोहित दीपक झंवर याने गणित या कठीण विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहे त्याने दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून नावलौकिक केले आहे याचे श्रेय रोहित आपल्या आई-वडिलांना व गुरुजनांना देत आहे