Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अ. भा. मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी सुरेश पारधे

सिंदखेडराजा:- तालुक्यातील तांदुळवाडी येथील सुरेश पारधे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या बुलडाणा जिल्हा कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

SURESH PARADHE


मराठी भाषेच्या विकासासाठी प्रयत्न तसेच नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी शरद गोरे, आनंदकुमार शेंडे व जिल्हाध्यक्ष वर्षाताई राज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अ. भा. साहित्य परिषदेची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये धडाडीने कार्य करण्याची क्षमता असल्याने सुरेश पारधे यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
जिल्हा कार्यकारिणीत महासचिव किशोर भागवत, खामगाव तर सुरेश तायडे, मलकापूर यांची उपाध्यक्ष पदी तसेच नंदिनी विकास वैराळे, शेगाव कोषाध्यक्ष, दीपक सरप, शेगाव संघटक, मिलिंद सोनोने, संग्रामपूर विश्वस्त, प्रवीण काकडे, देऊळगावराजा हे संपर्क प्रमुख, शेख हमीद पाशा, संग्रामपूर हे प्रसिद्धी प्रमुख, हि. रा. गवई, चिखली हे प्रमुख सल्लागार तर मैनाताई वासुदेवराव सुभेदार ह्यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
सुरेश पारधे यांच्या निवडीमुळे साहित्य क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.