रवींद्र सुरूशे चिखली – शनिवारी २९ मे अचानक आलेल्या वादळी वारा व पावसामुळे चिखली तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चिखली तालुक्यात आज सायंकाळी पाच ते सहा च्या दरम्यान अचानक वादळी वारा व पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यां सह नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये चिखली शहरातील भरडा च्या मळ्यात असलेले 150 वर्षापूर्वीचे भलेमोठे वटवृक्ष वादळी वाऱ्यामुळे कोलमोडून पडल्यामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या नुकसानी मध्ये अविनाश अशोक भराड यांची मोटर सायकल गाडी व ट्रॅक्टर चक्काचूर झाले आहे. तसेच चार चाकी कार, शाईन गाडी तसेच बैलगाडी यावर वटवृक्ष कोसळल्यामुळे लाखो रुपयांच आर्थिक नुस्कान झाली आहे. तसेच लहू भराड यांच्या घराच्या भिंती कोसळल्या. अशा या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. व लाखो रुपयाची नुकसान वादळी वारा करून गेला. नुकसान झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर शासनाने मदत करावी अशी मागणी लहू भराड, अविनाश भराड, विशाल भराड, राजू भराड, सुरेश भराड,जीवन भराड नामदेव भराड व नागरिक करीत आहे.