प्रतिनिधी : शेगाव गेल्या वर्षी कोरोणा महामारीचा शिरकाव झाल्या पासून सुरळीत चालणारे जनजीवन विस्कळीत झाले. कोरोनामुळे अनेकांचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्या पासून शेतकरी ही सुटला नसून त्यातच भर म्हणूननिसर्गाचा लहरी पणा आहेच माघील खरीप हंगामात शेतकऱ्यांना पाहिजे तसे पीक झाले नाही. कोरोना महामारी मुळे सर्वच क्षेत्र बाधित झाले असल्या मुळे शेतकऱ्यांना सर्वात जास्त झळ सोचवी लागत आहे.
शेत मालाला शेतकऱ्यांना त्याचा घामाचा योग्य दाम कधीच मिळत नाही.आणि भविष्यात मिळेल याची शास्वती नाही अश्या अनेक कारणाने शेतकरी कर्जात पिडला आहे. शेतकऱ्यांनी पैसा आणावा कुठून खरीप हंगामाच्या पेरणी करिता पैशाची जुळवा जुळव कठीण जात आहे. बॅंकाच्या अटी बळावलेल्या आहेत. शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या तयारीत लागला आहे शेतीची कामे व पेरणी करिता लागणारा पैसा नसल्या मुळे शेतकरी पुर्ता हवालदिल झाला आहे. आपणास या निवेदना द्वारे कळवितो की कुठल्याही नियम अटी न लावता शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज तसेच पुनर्गठन पीक कर्ज उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी निवेदना द्वारे केली.