शेगाव : पुणे येथील खडकवासला जवळील कोल्हेवाडीत कारमधून जाणार्यावर गोळीबार करण्याचा एकतर्फी प्रेमातून प्रकार काल घडला होता. याप्रकरणी हवेली पोलिसांनी अक्षय उर्फ रावण चंद्रकांत उभे (रा.कोल्हेवाडी) या आरोपीस अटक केली असून आरोपीला पिस्तूल ही शेगाव (बुलढाणा ) च्या एका मित्राने पुरवली असल्याची कबुली अक्षय उर्फ रावण चंद्रकांत उभे याने दिल्यावरून शुक्रवारी पुणे पोलिसांनी शेगाव येथे पोहोचून आरोपीचा मित्र रवींद्र रमेश खेडकर यास अटक केली.
गुरुवारी पुणे येथील खडकवासला भागात एकतर्फी प्रेमातून गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली होती . ही घटना खडकवासलाजवळील कोल्हेवाडी येथे घडली . सदर आरोपीने कारमधून जाणार्यावर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी अक्षय चंद्रकांत दुबे याचेवर हवेली पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अक्षय चंद्रकांत दुबे आरोपीस अटक करण्यात आली आहे. तर अक्षय दुबे याने पोलीसांच्या चौकशीत घटनेत वापरलेली देशी पिस्तूल ही शेगावच्या एका मित्राने आपल्याला 45 हजार रुपयात विकल्याची कबुली दिली या कबुली नंतर आज पुणे शहरातील हवेली पोलीस स्टेशनचे पथक शेगाव येथे पोहचले. यावेळी त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेत पिस्तूल विकणार्या मित्र रवींद्र रमेश खेडकर याला ताब्यात घेतले व त्यास घेऊन ते पुण्याकडे रवाना झाले.