जालना प्रतिनिधी :/भाजप युवा मोर्चा पदाधिकारी शिवराज नारियालवले यांना काठी तुटे पर्यंत मारहाण करतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच वृत्तपत्रानी सदरील प्रकरण लावून धरले . भाजप नेते व माजी मुख्यमंत्री / विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी तात्काळ दोषी पोलिसांविरुद्ध कारवाईची मागणी केली होती दरम्यान या मागणीला 24 तास हि उलटत नाही तर जालना जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पोलीस उपनिरिक्षक सह पाच जणांना तडका-फडकी निलंबित केल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
जालना येथील भाजप युवा मोर्चा पदाधिकारी शिवराज नारियालवाले यांना 9 एप्रिल रोजी शिवीगाळ करतांनाच चित्रीकरण केलं म्हणून लाचखोर प्रकरणात अडकलेले पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर,पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व अन्य पोलीस कर्मचाऱयांनी काठ्या तुटे पर्यंत बेदम मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली व 27 मे रोजी मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असता या व्हिडीओ ची खूप चर्चा झाली व मीडियाने लक्ष वेधले असता माजी मुख्यमंत्री फडणवीस,चित्रा वाघ व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी कारवाईची मागणी केली.
या video मध्ये दिसणारे निलंबित पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल औरंगाबाद पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून, उद्या कारवाईची शक्यता आहे.
दरम्यान 28 मे रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी मारहाण प्रकरणी
पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस कर्मचारी सोमनाथ लहानगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे याांना निलंबित केले.