ग्रामपंचायत नेच घेतला ग्रामपंचायत ने केलेल्या कामाविरुद्ध ठराव
गजानन सोनटक्के जळगाव जा
ग्रामपंचायत नेच घेतला ग्रामपंचायत ने केलेल्या कामाविरुद्ध ठराव
गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत ने 15 वित्त वित्त आयोग अंतर्गत 2022 23 पूल बांधकाम ता .मा. क्र.434 वार्ड नंबर चार मधील गोरक्षनाथ मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यावर केलेल्या पूल बांधकामा विषयी दिनांक 8 2 2023 रोजी सरपंच रामेश्वर अंबडकार यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा झाली यामध्ये ग्रामपंचायत सदस्य गजानन गणपत दातीर सदर पुलाचे बांधकाम हे अंदाजपत्रकानुसार झाले नाही असा मुद्दा उपस्थित केला व त्याला अनुमोदक म्हणून कौशल्या दिनेश ढगे ग्रामपंचायत सदस्य सुनगाव यांनी याविषयी चर्चा मांडली असता सदर पुलाचे बांधकाम हे अंदाजपत्रकानुसार झाले नाही व त्या पूल बांधकामांमध्ये वापरलेले साहित्य हे अंदाजपत्रकानुसार वापरले नाही त्यामुळे पुलाची लांबी रुंदी कमी झाली आहे त्यामुळे ते बांधकाम हे लोकांच्या उपयोगीतेचे झाले नाही त्यामुळे या पूल बांधकामाचे पूर्ण चौकशी झाल्याशिवाय या बांधकामाचे देयक अदा करू नये असा मासिक सभेत ठराव घेण्यात आला परंतु 15 वित्त आयोग अंतर्गत पूल बांधकाम हे ग्रामपंचायत च्या सरपंच सचिव यांच्या देखरेखी मध्ये असताना हे बांधकाम अंदाज पत्रका नुसार का झाले नाही या बांधकामाच्या वेळी सरपंच काही ग्रामपंचायत सदस्य व संबंधित अभियंता हे कामावर हजर असताना सुद्धा अंदाज पत्रका नुसार पुलाचे बांधकाम करण्याची गरज का ग्रामपंचायतला भासली नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरूआहे व ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांच्या देखरेखी खालीच जर फुल बांधकामाचे काम झाले तर अंदाजपत्रक याला महत्त्व न देऊन बांधकाम कसे करण्यात आले व संबंधित कामाच्या विरुद्ध ग्रामपंचायतीने केलेल्या कामाच्या विरुद्ध देयक न अदा करण्याचा ठराव सरपंचासहित सर्व सदस्यांच्या संमतीने सर्वानुमाते ग्रामपंचायत सूनगाव यांच्या मासिक सभेमध्ये ठराव पारित झाला तरी ग्रामपंचायत केलेल्या ग्रामपंचायतच्या पूल बांधकाम विषयी ग्रामपंचायतला विरुद्ध ठराव घेण्याची वेळ का आली यामुळे सुनगाव येथील नागरिक संभ्रमात आहेत