श्री आवजी सिद्ध महाराज नगरीत उसळला जनसागर
लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
गजानन सोनटक्के
जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव देव भूमीत दिनांक 12 फ्रेब्रु रोजी भक्तांची महाप्रसादासाठी व दर्शनासाठी तुफान गर्दी पाहायला मिळाली
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा राज्यातील लाखो भाविक श्रीआवजी सिद्ध महाराज नगरीत दर्शन व महाप्रसाद घेण्यासाठी दाखल झाले.
दिवसभर हजारो महिला भक्तांनीचुलीवर शेकडो क्विंटल ज्वारी च्या भाकरी तयार केल्या तर पुरुष भक्तांनी उडीदाचे वरणाचा महाप्रसाद तयार केला
आवजी सिद्ध महाराज यांची संध्याकाळी सामूहिक आरती करून श्री आवजी सिद्ध महाराज मंदिरात महाराज यांना नैवैद्य दिल्यानंतर सर्वप्रथम महिलांना महाप्रसाद वितरित करण्यात आला.
राज्यासह अकोला अमरावती बुलढाणा रावेर जळगाव खान्देश आदी ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात भक्तगण आज आवजी सिद्ध महाराज यांच्या दर्शन व महाप्रसाद घेण्यासाठी दाखल झाले होते.
सूनगावचे श्री आवजी सिद्ध महाराज हे जागृत देवस्थान असून येथील ज्वारी ची भाकर आणि उडदाची डाळ या महाप्रसा दाला खूप महत्व आहे. त्यामुळे वर्ष भरातून एकदा तरी या कार्यक्रमाला येतो.
आज श्री आवजी सिद्ध महाराज संस्थान चे नियोजन एवढे जबरदस्त होते की लाखोंची गर्दी असतानाही कोणीही या महाप्रसाद पासून वंचित राहत नाही
जवळपास 100 क्विंटल च्या वर ज्वारी च्या भाकरीचा महाप्रसाद तयार करण्यासाठी हजारो महिला भक्ताचे हात लागले.
संध्याकाळी 7 वाजता सर्व महाप्रसाद पूर्ण पणे तयार झाला उडीदाचे वरन साठविण्या साठी मोठ मोठ्या सिमेंट हौद तयार करण्यात आले होते.
अतिशय शिस्त आणि पद्धतशिर पने गावकरी व संस्थान च्या वतीने नियोजन करून आज दिवस भर एकाच दिवसात लाखो भक्ताचा महाप्रसाद तयार केला हे विशेष गावातील सर्व लोक तरुण बालके महिला या दिवशी कोणीही या दिवसी घरी न राहता श्री आवजी सिद्ध महाराज मंदिरात सेवा देतात त्यामुळे या गावात जणू दिवाळी आज साजरी झाल्यासारखे वाटले योग्य नियोजनामुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा संध्याकाळी 7वाजून 30मिनिटांनी महाप्रसाद पंगत सुर वात झाली. विशेष म्हणजे पहिली पंगत महीलाची बसविण्याची प्रथा येथे आहे.
सर्व पांच्क्रोशितील लाखो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.