जामोद, सुनगाव,उसरा फाटा येथे नवीन प्रवासी निवारे बांधा या मागणीसाठी प्रहार चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन…
जामोद, सुनगाव,उसरा फाटा येथे नवीन प्रवासी निवारे बांधा या मागणीसाठी प्रहार चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन…
गजानन सोनटक्के
जळगाव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील जामोद सुनगाव व उसरा फाटा येथील प्रवासी निवारे नादुरुस्त स्थितीत असून त्यामध्ये जामोद व उसरा फाटा येथे प्रवासी निवारे हे जमीनदोस्त झाले असून सुनगाव येथील दोन्हीही प्रवासी निवारे अतिक्रमणाच्या विडख्यात जखडलेले आहेत त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष द्यावे प्रवासी तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना बसायला कोणताही निवारा नाही पावसाळ्यामध्ये व उन्हाळ्यामध्ये नागरिकांना हक्काचे छत नसून त्याचा त्रास प्रवासी व शाळेच्या विद्यार्थ्यांना होत आहे. तसेच प्रवासी व विद्यार्थी वर्ग ज्या ठिकाणी उभे राहतात त्या ठिकाणी अतिक्रमित दुकाने असून त्यांचाही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व प्रवाशांना त्रास होत आहे. तसेच रस्त्यावर येणारे वर आधारित अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने ताबडतोब काढावे तसेच नवीन प्रवासी निवारे बांधून प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी अशा मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभाग जळगाव जामोद यांना दिनांक आठ फेब्रुवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष राजेश लहासे यांच्या नेतृत्वात देण्यात आले निवेदन देतेवेळी प्रहार चे उपजिल्हाप्रमुख राजेश लहासे,रोशन सपकाळ,आकाश तेलग्रे,अमोल बोडखे,गणेश सपकाळ, रोशन पद्मणे,निलेश बावणे,गणेश दलाल,अतुल वाघ,अमोल ढगे,सागर दातीर,संतोष येऊल यांची उपस्थिती होती. तर निवेदनावर विद्यार्थी पालक यांच्यासह बहुसंख्य प्रवाशांच्या सह्या आहेत. तसेच प्रवासी निवारे नवीन झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष लोकशाही मार्गान आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला…