मातृतीर्थ सिंदखेडराजा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोठ्या संख्येने हायवे रोड वर रास्ता रोको करण्यात आला
दिनांक 6 फेब्रुवारी रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोठ्या संख्येने हायवे रोड वर रास्ता रोको करण्यात आला सामाजिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या रोड व पुलाच्या झालेला अतिशय निकृष्ट दर्जाच्या वअपूर्ण कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी या पुलावरती घेतलेली नाही साधे कठडे ही बांधलेली नाहीत पायी चालणारा माणूस सुद्धा जीव धोक्यात घालून चालतोय.
अशा परिस्थितीत हे काम आहे या अशा कामाबद्दल हा रास्ता रोको करण्यात आला आहे जसे की दिनांक 28 12 2022 रोजी निवेदन देऊन सुद्धा गेल्या दीड-दोन महिन्यापासून पाठपुरावा करून देखील अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार मे श्री पलसिध्द कंट्रक्शन कॉन्ट्रॅक्टदार मुक्काम पोस्ट साखरखेर्डा यांनी कुठलीही दखल न घेतल्यामुळे व संबंधित कामाचे इंजिनियर सचिन वाघ यांना कामाबद्दल विचारणा केली असता उडवा उडवी चे उत्तर त्यांनी आम्हाला दिले .
विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अभिदादा देशमुख यांच्या नेतृत्वात जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनानंतर जर आठ दिवसांमध्ये या कामाची पूर्तता न केल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचा आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छेडण्यात येईल व संबंधित विभाग याला जबाबदार असेल असे यावेळी महाराष्ट्र निर्माण सेना युवा नेते अभि दादा देशमुख यांनी सांगितले आहे
आपल्या इथे शासनाचा होणारा पैसा याकडे प्रामुख्याने गावातील नागरिकांचे ही लक्ष असावे अधिकारी कोणाला काम देतात काम कोणत्या दर्जाचं होतं किती पैसे आलेत काम कसे होते या सगळ्या गोष्टीकडे गावकरी मंडळींनी व परिसरातील लोकांनी जनतेने लक्ष देण्याची गरज आहे शासनाचा पैसा म्हणजे आपला पैसा असे गृहीत धरून त्या संबंधित कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे असेही यावेळी अभिदादा देशमुख यांनी आव्हान केले आहे .
माझ्या तालुक्यात निकृष्ट दर्जाचा व चुकीच्या पद्धतीने कामे होऊ देणार नाही वेळोवेळी शासनाच्या झालेल्या कामाबद्दल आमच्या पक्षाच्या वतीने सातत्याने प्रत्येक कामाच्या मी शहानिशा करणार तपासणी करणार माहिती घेणार त्यात दोषी आढळलेल्या अधिकारी वर्गातील व्यक्ती ला कारवाईला सामोरे जावे लागेल तालुक्यातील सर्व कामकाजाकडे प्रामुख्याने लक्ष देणार व जनहिताची कामे असे चालू ठेवणार वेळोवेळी आंदोलन छेडणार