मातोश्री नथीयाबाई विद्यालय सुवर्ण महोत्सव कार्यक्रम संपन्न
गजानन सोनटक्के
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील स्वर्गीय डोंगरसिंहजी राजपूत यांनी आपल्या गावामध्ये एका विद्यालयाची स्थापना 1972 ला केली होती त्या लावलेल्या रोपाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. त्यानंतर शाळेच्या अध्यक्ष पदाची धुरा स्वर्गीय श्री दर्यावसिंह राजपूत यांनी समर्थपणे पार पडली. या विद्यालयाला 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यनिमित्त सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम विद्यालयाकडून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची कल्पना शाळेचे अध्यक्ष प्रा. डॉ. कुलदीपसिंह यांनी मांडली. या कार्यक्रमात माजी शिक्षक सत्कार व माजी विद्यार्थी सत्कार हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला मंचकावरविद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती येथील सचिव चव्हाण साहेब कार्यालय सचिव एन वाय पाटील साहेब प्राध्यापक सोमवंशी सर विद्यालयाचे अध्यक्ष प्रा. डॉक्टर कुलदीपसिंहजी राजपूत, राजकुमारसिंह राजपूत, श्रीमती ज्योतीबाई राजपूत, मुख्याध्यापक इंगळे सर, पांडुरंग गवई उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या विद्यालयामार्फत माजी शिक्षक श्री पी आर जाधव सर, श्री कोकाटे सर, अंबडकार मॅडम यांचा सत्कार करण्यात आला व शाळेच्या पहिल्या तीस वर्षातील माजी विद्यार्थी यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
मातोश्री नाथियाबाई विद्यालयाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. डॉ. कुलदीपसिंह राजपूत यांनी शाळेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कार्यक्रम निमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी रावसाहेब शेखावत आदर्श विद्यार्थी पुरस्कार, देवीसिंह शेखावत अवॉर्ड for Excellence, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार, स्व. दर्यावसिह राजपूत इंग्रजी भाषा प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले व ते यापुढेही सुरू राहतील
व त्यानंतर विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावतीचे सचिव चव्हाण साहेब यांनी विद्यालयाला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली व यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर प्राचार्य कुलदीप सिंह राजपूत यांनी शाळेमध्ये गुणवत्ता, शिस्त आणि चारित्र्य आणण्यासंदर्भात कटिबध्द आहोत, या शाळेला बुलढाणा जिल्ह्यातील एक उत्तम शाळा बनवण्याचा प्रयत्न करू, कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही, रुरल टॅलेंट ला आपण पुढे आणू असे मत व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोटेकर मॅडम आणि आभार सोळंके सर यांनी केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक इंगळे सर आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक कष्ट घेतले.